Ashish Shelar : याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण तापले; पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शेलारांचा शिवसेनेला टोला
भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते असा खोचक टोला शेलारांनी लगावला आहे.

Image Credit source: social media
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून भाजपाने (BJP) आता शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते असा खोचक टोला शेलारांनी लगावला आहे. भाजपच्या इतर नेत्यांकडून देखील हाच मुद्दा पकडत शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.
