भाजप पदाधिकाऱ्याच्या जीवाला पवार यांच्यांकडून धोका, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Apr 12, 2023 | 3:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजप नेत्याने केल्या. या प्रकरणात पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याचा जबाबही घेतला आहे. त्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्याच्या जीवाला पवार यांच्यांकडून धोका, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली गेली आहे. अजित पवार यांच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले गेले आहे. ही तक्रार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याचा जबाबही घेतला आहे. भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता अजित पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार


भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांच्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्याला माझ्याकडून धोका आहे, त्याला सुरक्षा प्रदान केली गेली पाहिजे. मी कायदा आणि संविधाननुसार चालणारा व्यक्ती आहे. माझ्याकडून कोणाला धोका कसा होणार? काय तुम्हाला वाटते की, माझ्याकडून कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा मोजक्या शब्दांत अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण

गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भातील हा प्रकार आहे. या प्लॉटची मोजणी न करण्याचे आदेश न्यायालयाचे दिले आहे. त्यानंतरही या प्लॉटची मोजणी केली जात होती. हा प्लॉट भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांचा आहे. यामुळे त्यांना सतत धमकी दिला जात आहे, असे साळगावकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात त्यांनी अजित पवार यांचे नाव घेतले आहे.

अंजिल दमानिया यांच्या त्या ट्विटची चर्चा

अजित पवार यांच्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा

अजित पवार यांच्याकडून कोणाच्या जीवाला धोका? प्रकरण गेले पोलिसांत