
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय. या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शाह संवाद साधणार आहेत.
तसेच कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरलाही ते भेट देणार असून, बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी शहा यांच्याकडून शुक्रवारी करण्यात येणार आहे. पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन समारंभासही शाह उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यातील येरवड्यातील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. अमित शाहंच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पुण्यात वाहतूक मार्गात काय बदल केलेत?
अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील काही भागात वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा खडीमशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व मालवाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक दरम्यानचे वाहतूक एकरी आवश्यकतेनुसार सूत्रपा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलीय.