शहीद मेजर शशीधरन यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

पुणे : शहीद मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्कराकडून शहीद मेजर नायर यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. नायर यांच्या पत्नी तृप्ती आणि कुटुंबीयांनीही पुष्पचक्र वाहिलं. यानंतर नायर यांचं पार्थिव लष्कराकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी मेजर ‘शशीधरन नायर अमर रहे… भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. रविवारी सकाळी […]

शहीद मेजर शशीधरन यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना
Follow us on

पुणे : शहीद मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्कराकडून शहीद मेजर नायर यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. नायर यांच्या पत्नी तृप्ती आणि कुटुंबीयांनीही पुष्पचक्र वाहिलं. यानंतर नायर यांचं पार्थिव लष्कराकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी मेजर ‘शशीधरन नायर अमर रहे… भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या.

रविवारी सकाळी नायर यांचं पार्थिव खडकवासला इथल्या घरी नेलं जाणार आहे. सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. नायर यांच्या पश्चात पत्नी, आई आणि बहीण असा परिवार आहे.

नायर हे जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आयईडी स्फोटात शहीद झाले. नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी स्फोट झाला होता. नायर हे मूळचे केरळचे रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यातील खडकवासला परिसरात राहतात. नायर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलंय. तर 2007 साली देहरादूनच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं.

गेल्या 11 वर्षांपासून ते लष्करात कार्यरत होते. सध्या ते गोरखा रायफलच्या  बटालियनमध्ये तैनात होते. 11 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचा लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्याप्रमाणेच पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी संभाळली होती.