Pune Municipal elections| प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होताच; महिला राजकारणीय सक्रिय मतदार संघात पकड ठेवण्यासाठी उचललं ‘हे’ पाऊल

प्रभागात हळदी कूंकुवाचा कार्यक्रम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना साधारण 5 ते दहा लाख खर्च करावा लागत आहे. त्यात साधारण 100 रुपयापर्यंतच्या वस्तू भेट दिल्या जात आहेत. यात चार -पाच हजार महिला सहभागी होतात. महिलांची संख्या वाढली की खर्चाच्या रक्कमतेत वाढ होताना दिसून येत आहे.

Pune Municipal elections| प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होताच; महिला राजकारणीय सक्रिय मतदार संघात  पकड ठेवण्यासाठी उचललं हे पाऊल
PMC
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 14, 2022 | 5:10 PM

पुणे – आगामी महानगरपालिकेसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या महापालिका निवडणुकी (Pune Municipal elections) साठी प्रभाग जाहीर शहारातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागांनुसार पडणाऱ्या आरक्षणाचा अंदाज बांधत राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. यामध्ये महिला राजकारणीही (Women politicians )मागे नसल्याचे दिसून आले आहे. आपल्या प्रभागात(ward) सक्रिय होत महिला उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी मतदारांच्या सोबतच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. कधी हळदी कुंकू , तर कधी पण सुपारीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत आहे. या प्रकारचे कार्यक्रम करण्यावर मोठाभर दिला जात आहे. अनेक इच्छुक महिला अपेक्षित प्रभागात हळदी-कुंकू कार्यक्रम घेत आहे. राजकीय पक्षांनीही तसे आदेश दिली आहेत.

या भागात हळदी-कुंकू कार्यक्रमांची रेलचेल
निवडणुकीसाठी विवि  राजकीय पक्षाच्या महिला आघाडीकडूनही प्रभागात हळदी-कुंकू कार्यक्रम घेतळे अजात आहेत.त्यामध्ये औंध, बाणेर, पाषाण, सूस, महाळुंगे यासह अन्य भागातही अशा कार्यक्रमाची रेलचेल मोठी दिसली. 500 ते 1000 रुपयांच्या साड्यांपासून ते अगदी 20 किंवा 30 रुपयांचे वाण देत इच्छुक महिला उमेदवारांनी प्रत्येक मतांला आपले कुंकू लावून ठेवले आहे.

5 ते 10 लाखांपर्यंत खर्च

प्रभागात हळदी कूंकुवाचा कार्यक्रम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना साधारण 5 ते दहा लाख खर्च करावा लागत आहे. त्यात साधारण 100 रुपयापर्यंतच्या वस्तू भेट दिल्या जात आहेत. यात चार -पाच हजार महिला सहभागी होतात. महिलांची संख्या वाढली की खर्चाच्या रक्कमतेत वाढ होताना दिसून येत आहे. सद्य स्थितीला कोरोनाच्या नियमाचे पालन करून या स्पर्धांचे आयपजन केले जात आहेत. अनेक ठिकाणी तरर विद्यमान नगरसेवकांनीच पत्नी व आईच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

Valentine’s Day : करिश्मा तन्नाचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे, स्विमिंग पूलमधला फोटो शेअर करत म्हणाली…

‘शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल’, संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांचा निर्वाणीचा इशारा

जवानांनी स्वीकारलंय Online गाण्याचं चॅलेंज, पाहा कोण कसं गातंय? Viral Video पाहुन हसू येईल…