Pimpri Chinchwad crime : जिलेटिनच्या कांड्या लावून पिंपरी चिंचवडमध्ये उडवलं एटीएम, मात्र रोकड काही लुटता आली नाही; चोरटे पसार

| Updated on: Apr 21, 2022 | 10:06 AM

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) जिलेटिन कांड्यांचा वापर करून एटीएम फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बँकेचे एटीएम (Canara bank) जिलेटिनच्या कांड्या लावून उडवण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad crime : जिलेटिनच्या कांड्या लावून पिंपरी चिंचवडमध्ये उडवलं एटीएम, मात्र रोकड काही लुटता आली नाही; चोरटे पसार
जिलेटिनच्या कांड्या लावून उडवलं एटीएम
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) जिलेटिन कांड्यांचा वापर करून एटीएम फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बँकेचे एटीएम (Canara bank) जिलेटिनच्या कांड्या लावून उडवण्यात आले आहे. यात लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एटीएम (ATM) लुटण्याचा उद्देशाने हा ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात किती नोटा जळून खाक झाल्या, याची माहिती बँक अधिकारी आल्यानंतरच मिळणार आहे. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे चोरट्यांना रोकड लुटता आलेली नाही. दोन अज्ञात चोरट्यांनी या धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. कारण त्यांना रोकड लुटताच आली नाही. घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला, आता पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आधीही घडला होता प्रकार

एटीएम मशीनजवळ जिलेटिन कांड्या या चोरट्यांनी ठेवल्या. तर पंचवीस मीटर अंतरावर वायर टाकली आणि कशाच्या तरी साह्याने करंट पास करून हा ब्लास्ट घडविण्यात आला. मात्र या ब्लास्टमुळे मशीनच्या वरील पत्रा केवळ बाजूला झाला. रोकडच्या वर असलेला जाड पत्रा मात्र तसाच राहिला आहे. त्यामुळे चोरट्यांचा रोकड लुटण्याचा डाव फसला आहे. कारण याआधीही अशाप्रकारे रोकड लुटण्याचे प्रकार घडले आहेत. विशेषत: पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे ब्लास्ट करून एटीएममधील रोकड लुटण्यात आलेली आहे. आता याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा :

Pune Police : वसुली भोवली; पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निलंबित

Pune crime: 10 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करणाऱ्या 10 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड, 8 वर्षांनी निकाल

Pune Crime : लष्करातील निवृत्त कर्नलनं पत्नीवर गोळ्या झाडल्या, पत्नीची हत्या करुन स्वतःही जीव दिला