AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना मोठा झटका, जवळचे सहकारी गोत्यात? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी धडाधड…

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्यात सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्ती सहकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा बजावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पार्थ पवारांशी संबंधित या प्रकरणात पुरावे छेडछाड केल्याचा संशय आहे. विकास पाटील आणि राम चौबे या शासकीय अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे आता कसून चौकशी होणार असून, हा सुनेत्रा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना मोठा झटका, जवळचे सहकारी गोत्यात? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी धडाधड...
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 3:46 PM
Share

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या दोन सहकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्या नोटिसांना ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात विकास पाटील आणि राम चौबे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. दोघेही सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दोघेही शासकीय अधिकारी आहेत. पवार कुटुंबाच्या वैयक्तिक आणि राजकीय कामांमध्येही हे दोघे सक्रिय असल्याचं सांगितलं जातं. मुंढवा जमीन प्रकरणात या दोघांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पार्थ पवारांशी संबंध

मुंढवा येथील 40 एकर शासकीय जमिनीच्या व्यवहारात या दोघांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आर्थिक गुन्हा शाखेला संशय आहे. हे प्रकरण पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीशी संबंधित आहे. हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं, तेव्हा राम चौबे आणि विकास पाटील हे अजित पवार यांचे पीए म्हणून कार्यरत होते. आता या प्रकरणात या दोघांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

व्हाटसअप चॅटची चौकशी होणार

या दोघांनी पार्थ पवारांना मदत केल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी या आधीच आरोप केला आहे. या घोटाळ्यात पार्थ पवारांना वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय पातळीवर मदत करण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली असल्याचा आरोप आहे. या दोघांचे व्हाटसअप चॅट आणि पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. राम चौबे आणि विकास पाटील यांचे या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींशी आणि अधिकाऱ्यांशी झालेले व्हॉट्सॲप चॅटिंग उघड झाले आहे. या चॅटिंगच्या आधारावर त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका