राज्यात दंगली घडवण्याचा कट, कॉल रेकॉर्डिंगमधून मिळाली माहिती, भाजप नेते मुनगंटीवार यांचा दावा

| Updated on: May 18, 2023 | 3:33 PM

Pune News : राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप-प्रत्यारोप सत्ताधारी अन् विरोधकांकडून केला जात आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी कॉल रेकार्डिंग असल्याचे म्हटलेय.

राज्यात दंगली घडवण्याचा कट, कॉल रेकॉर्डिंगमधून मिळाली माहिती, भाजप नेते मुनगंटीवार यांचा दावा
Image Credit source: tv9
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या घटनेनंतर राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका सुरु केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हनी ट्रॅप प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर, शेवगाव, अकोल्यात दंगली घडविल्या जात आहेत, असल्याचा आरोप केला होता. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक आरोप केला आहे. पुणे शहरात एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे, ज्यामध्ये तो राजकीय दंगे भडकवा, असे म्हणत आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

काय म्हटले सुधीर मुनगंटीवार 

राज्यात काही ठिकाणी दंगे भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. अशी माहिती गृह विभागाला मिळाली आहे. याबाबत पुण्यात एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामध्ये तो म्हणाला आहे की, राजकीय दंगे भडकवा. काही लोकांचा असे दंगे भडकून सत्तेत येण्याचा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा

कोण संजय राऊत ? हे अजित दादा म्हणतात

संजय राऊत यांच्यांकडून सत्ताधाऱ्यांवर वारंवार आरोप होत आहे. त्याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, अजित दादा यांनीच प्रश्न केला होता, कोण संजय राऊत ? संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं. संजय राऊत यांच्यांसाठी नितेश राणे यांची जोडी आम्ही तयार केली आहे.

त्र्यंबकेश्वर जुनी परंपरा

त्र्यंबकेश्वरमधील प्रकरणीची चौकशी पूर्ण केला नंतर निष्कर्षापर्यंत पोहचल पाहिजे. या अगोदर कोणत्या वर्षी धूप दाखवले गेले, ही परंपरा किती वर्षापासून आहे? खरंच ही 500 वर्षे जुनी परंपरा आहे का? हे सर्व चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

ही परंपरा नाहीच

त्र्यंबकेश्वरमध्ये संदल काढण्याची प्रथा आहे की नाही, याबाबत अभ्यासक राजेश दीक्षित यांनी मत व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वाराच्या रस्त्यावरून संदल जाते. मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर धूप दाखवण्याची परंपरा आहे. मात्र या संदलमधील कोणीही मंदिराच्या पायरीजवळ किंवा मंदिराच्या आतमध्ये जाण्याची प्रथा नसल्याचे स्पष्टीकरण अभ्यासक राजेश दीक्षित यांनी दिली आहे.

तसेच दोन-तीन स्थानिक नागरिकांच्या कृतज्ञतेचा आणि भक्तीचा फायदा घेऊन कुणीतरी बाहेरील लोक या ठिकाणी चुकीची पायंडा-परंपरा पाडत असल्याचा आरोप देखील राजेश दीक्षित यांनी केलाय. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये इतर धर्मियांना प्रवेश नसल्याचे स्पष्ट मत राजेश दीक्षित यांनी मांडले आहे.