Pune corona : कोरोनामुळे मुंबईनंतर पुण्याला धडकी, दोन जम्बो कोविड सेंटर सुरू करणार

| Updated on: Jan 12, 2022 | 10:19 PM

गेल्या काही दिवसात पुण्यातली रुग्णसंख्या हजाराच्या खाली गेली होती, मात्र आता ती वेगाने वाढू लागली आहे. दिवसभरात 4 हजार 857 नवे रुग्ण वाढल्याने पुणे प्रशासनाची झोप पुन्हा उडाली आहे.

Pune corona : कोरोनामुळे मुंबईनंतर पुण्याला धडकी, दोन जम्बो कोविड सेंटर सुरू करणार
पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटने चिंता वाढवली आहे. आधी मुंबईतली (Mumbai) कोरोना रुग्णांची सख्या धडकी भरवणारी आली, त्यानंतर आतो पुणेकरांचेही (pune corone) टेन्शन वाढले आहे. कारण पुण्यातही कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ होत आहे, गेल्या काही दिवसात पुण्यातली रुग्णसंख्या हजाराच्या खाली गेली होती, मात्र आता ती वेगाने वाढू लागली आहे. दिवसभरात 4 हजार 857 नवे रुग्ण वाढल्याने पुणे प्रशासनाची झोप पुन्हा उडाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण घटल्याने पुण्यातली जंबो कोविड सेटर बंद करण्यात आले होते. मात्र आता ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येनं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. उद्यापासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन जम्बो कोविड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यविभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना काय आदेश?

पुण्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासनाकडून काही तातडीचे निर्णय घेण्यात येत आहेत. पुण्यात ओमिक्रॉनचा प्रसारही झपाट्याने होतोय, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दोन जंबो कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासाठी तत्काळ कर्मचारी भरती उद्यापासूनच सुरू करण्यात येणार आहे. शिवनेरी जम्बो कोव्हीड सेंटर आणि अवसरी जम्बो कोव्हीड सेंटर आंबेगाव या ठिकाणी ही कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

पुण्यातली सध्याची स्थिती काय?

पुणे शहरात 12 जानेवारीपर्यत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 22 हजार 503 इतकी आहे. यापैकी 95 टक्के रुग्ण हे होम आयसोलेश मध्ये असून केवळ 5 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.

पुणेकरांनो सावधान ; शहरातील 5 दिवसातील कोरोना आकडेवारी काय सांगतेय: पाच सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र

एक-दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर

मोनलूपिरावीर औषधांचे साईड इफेक्ट्स, वापर न करण्याचा निर्णय, तिसऱ्या लाटेत तारणहार कोण?