पुण्यात कोरोनाची भीती वाढली, या सर्व प्लँटमध्ये कोव्हीडचे व्हायरस, NCL कडून महत्वाची माहिती

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने पुणे येथील सांडपाणी प्रक्रिया प्लॅन्टमधील नमुन्यांची पाहणी केली. त्यात सर्वच ठिकाणी कोरोनाचे विषाणू मिळाले आहे. यामुळे पुण्यात कोरोनोचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुण्यात कोरोनाची भीती वाढली, या सर्व प्लँटमध्ये कोव्हीडचे व्हायरस, NCL कडून महत्वाची माहिती
corona
| Updated on: Jun 05, 2025 | 10:06 AM

Pune Covid Cases : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुणे शहरात कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील सर्व दहा सांडपाणी प्रक्रिया प्लॅन्टमध्ये कोरोनाचे विषाणू मिळाले आहेत. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने (एनसीएल) यासंदर्भात माहिती दिली आहे. एनसीएसला वेस्टवॉटर सर्व्हिलान्सच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. पूर्वी होती, त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत असल्याचे या तपासणीतून समोर आले आहे. यामुळे पुण्यात कोरोनाचे संक्रमण वाढल्याचा धोका आहे.

यामुळे समजले पुण्यात धोका वाढला

एनसीएलचे वैज्ञानिक आणि मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. महेश एस धर्ने यांनी सांगितले की, कोरोनात हळूहळू वाढ दिसून येत आहे. पुण्यातील सांडपाण्याच्या सँम्पलमध्ये कोरोना काळात असताना विषाणूंची पातळी जशी होती, तशीच आताही आहे. लोकांना अलर्ट राहणे गरजेचे आहे. पहिला नमूना २२ एप्रिल रोजी घेण्यात आला होता. तो पॉझेटीव्ह मिळाला. त्यानंतर ६ मे रोजी घेतलेले सर्व नमूनेही पॉझीटीव्ह आले आहेत. त्याचा अर्थ पुण्यात कोरोना व्हायरस वाढत आहे. त्यामुळे आम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

असे शोधले जातात कोरोनाचे व्हायरस

सांडपाणी प्रक्रिया केंद्र कोव्हीड ट्रॅक करण्याचे महत्वाचे केंद्र झाले आहे. त्या माध्यमातून संक्रमणाबाबत क्लीनिकल केसेस येण्यापूर्वीच माहिती मिळते. अनेक वेळा आठवड्यानंतर यासंदर्भात माहिती मिळते. सांडपाणी प्रक्रिया प्लॅटमधून नमूने घेतले जातात. त्यात SARS-CoV-2 च्या जेनेटिक मटेरियलची ओळख केली जाते. हा व्हायरस संक्रमित लोकांच्या मल-मूत्रांमधून बाहेर आलेला असतो. त्यामुळे कोरोनाचा धोका येत असल्याची माहिती मिळते.

सांडपाणी प्रक्रियात प्लॅन्टमधील तंत्रामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना संपूर्ण समुदायात संसर्गाच्या प्रसाराबद्दल माहिती मिळते. लक्षणे नसलेल्या प्रकरणांचा आणि नवीन प्रकारांचा मागोवा घेण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. क्लिनिकल चाचणी म्हणजे लोक चाचण्यांसाठी जात आहेत की नाही आणि त्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत की नाही याबद्दल असते. परंतु सांडपाण्याचे निरीक्षण केल्यास संपूर्ण परिसरात विषाणूबाबत माहिती मिळते.