AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का?, अजित पवारांनी भरसभेत मराठा तरुणांना झापले

शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात खडसावले. शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो.

VIDEO: तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का?, अजित पवारांनी भरसभेत मराठा तरुणांना झापले
अजित पवारांचं भावनिक आवाहन
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 11:24 AM
Share

शिवनेरी: शिवनेरीवर शिवजयंती (shiv jayanti) सोहळ्याच्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात खडसावले. शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, असा सवालच अजित पवार यांनी केला. आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) द्यायचं आहे. त्यांचं आरक्षण रखडवून आम्हाला काय आनंद मिळतो का? काही कायद्याच्या गोष्टी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. आम्ही स्वत: पंतप्रधानांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. सरकारचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. प्रयत्न सुरूच आहेत, असंही अजित पवारांनी (ajit pawar)  सांगितलं. तसेच ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मराठा तरुणांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली.

शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजी छत्रपती उपस्थित होते. यावेळी सभेचा कार्यक्रमही झाला. त्यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. . केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या.

काय म्हणाले अजितदादा?

अजितदादा: एक मिनिट.. मी तुम्हाला मघाशी बोलू दिलं. तुम्हाला सारखं सारखं बोलायचं नाही. एक मिनिट

तरुण: मराठ्यांना फाशीवर चढवणार का?

अजितदादा: एक मिनिट… ही भाषा नाही. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का? सुपारी घेऊन आलाय? ही पद्धत नाहीये बोलायची. आज शिवजयंती आहे. तुमचं आधी मी ऐकून घेतलं होत.

अजितदादांनी गोंधळी तरुणांना खडसावल्यानंतर लगेचचं जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष झाला. त्यानंतर अजितदादा पुन्हा बोलायला लागले.

या सर्व गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. मी वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, आम्ही मराठ्यांच्या पोटचेच आहोत ना? आमच्या जातीला, समाजाला आरक्षण न द्यायला आम्हाला काय आनंद आहे का? शिवबाने काय शिकवलं? महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. ही गोष्ट मान्य करावी लागेल. भावनिक करू नका. आम्हाला कळत नाही का? तरुण मुलांचं रक्त उसळतं असतं हे समजू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Shiv Jayanti 2022: आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे; अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना खडसावलं

जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 LIVE : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, जिजाऊ वंदना सादर

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!