AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे; अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना खडसावलं

बाळासाहेब थोरात काय, दिलीप-वळसेपाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आरक्षण खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का? असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.

VIDEO: आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे; अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना खडसावलं
अजित पवार
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 11:09 AM
Share

रायगड: बाळासाहेब थोरात काय, दिलीप-वळसेपाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा (maratha) समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आरक्षण खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का? असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खडसावले. शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाची (maratha reservation) मागणी केली. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय आला. तेव्हा अजितदादांनी या कार्यकर्त्यांना कडक शब्दात झापले.

शिवनेरी येथे शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार यांनी जनतेला संबोधित केलं. इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा आम्ही नियम केला. सर्व आमदारांनी तसा ठराव केला. 288 आमदारांनी ठराव केला. पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. काही राज्यात वेगवेगळं आरक्षण मागितलं जातं. बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चारपाचजण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे 12 मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तुम्ही काय सुपारी घेऊन आलात का?

यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची माहिती देण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यावर अजित पवार संतापले.

अजितदादा: एक मिनिट.. मी तुम्हाला मघाशी बोलू दिलं. तुम्हाला सारखं सारखं बोलायचं नाही. एक मिनिट

तरुण: मराठ्यांना फाशीवर चढवणार का?

अजितदादा: एक मिनिट… ही भाषा नाही. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का? सुपारी घेऊन आलाय? ही पद्धत नाहीये बोलायची. आज शिवजयंती आहे. तुमचं आधी मी ऐकून घेतलं होत.

अजितदादांनी गोंधळी तरुणांना खडसावल्यानंतर लगेचचं जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष झाला. त्यानंतर अजितदादा पुन्हा बोलायला लागले.

या सर्व गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. मी वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, आम्ही मराठ्यांच्या पोटचेच आहोत ना? आमच्या जातीला, समाजाला आरक्षण न द्यायला आम्हाला काय आनंद आहे का? शिवबाने काय शिकवलं? महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. ही गोष्ट मान्य करावी लागेल. भावनिक करू नका. आम्हाला कळत नाही का? तरुण मुलांचं रक्त उसळतं असतं हे समजू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

संभाजीराजेंना आवाहन

यावेळी त्यांनी खासदार संभाजी छत्रपती यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. संभाजीराजे आले होते. पण दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी ते निघून गेले. त्यांच्यासोबत बोलायचं होतं. पण त्यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी मी त्यांना विनंती करतो, असं त्यांनी सांगितलं. राज्यकर्ते कोणीही असो. विलासरावांच्या काळापासून हा प्रश्न सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिलं. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण दिलं. पण ते टिकलं नाही. पुन्हा आयोग नेमला. पुन्हा आरक्षण दिलं. हायकोर्टात टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. 50 टक्क्यापेक्षा आरक्षण देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं. त्यामुळे कायद्यात बदल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

संबंधित बातम्या:

जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 LIVE : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, जिजाऊ वंदना सादर

Maharashtra News Live Update : जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.