Pune entrance tests : प्रवेश परीक्षेवरून मतमतांतरं? महाविद्यालयं प्रवेश परीक्षेवर ठाम, तर अतिरिक्त ओझं नको म्हणून पालकांचा विरोध, वाचा…

| Updated on: May 14, 2022 | 7:30 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न असलेल्या अनेक स्वायत्त महाविद्यालयांनीही प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे, विशेषत: व्यावसायिक आणि स्वयं-अर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश परीक्षा आहेत. पालक मात्र यास विरोध करीत आहेत.

Pune entrance tests : प्रवेश परीक्षेवरून मतमतांतरं? महाविद्यालयं प्रवेश परीक्षेवर ठाम, तर अतिरिक्त ओझं नको म्हणून पालकांचा विरोध, वाचा...
CUET PG 2022
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होण्याच्या तारखा जवळ येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविद्यालये पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत. पालक मात्र या परीक्षांच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांवर जास्त ताण येईल आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना कमी क्रेडिट दिले जाईल, असे त्यांचे मत आहे. या वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET) आयोजित करेल. या व्यतिरिक्त, पुण्यातील अनेक खासगी विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालये त्यांच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षा घेतील. एमआयटी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी यासारखी खासगी विद्यापीठे अनेक वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न असलेल्या अनेक स्वायत्त महाविद्यालयांनीही प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे, विशेषत: व्यावसायिक आणि स्वयं-अर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी…

‘एका पातळीवर आणण्यासाठी गरजेची’

या प्रवेश चाचण्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातल्या ज्ञानाचा विकास साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे, तर पालक म्हणतात, की ते विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहेत. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC)मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) इत्यादी अनेक अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात आणि बरेच विद्यार्थी स्थानिक राज्य मंडळातून येतात, तर काही CBSE किंवा ICSEमधून येतात. प्रवेश परीक्षेची रचना त्यांना एका पातळीवर आणण्यासाठी करण्यात आली आहे, असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

‘हे न्याय्य नाही’

पालकांना मात्र असे वाटते, की अनेक प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या ओझे आहेत. गेले संपूर्ण वर्ष अनिश्चिततेचे होते. बोर्डाच्या अंतिम परीक्षा होणार की नाही याचीही विद्यार्थ्यांना खात्री नव्हती. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केला आणि नंतर त्यांनी ऑफलाइन परीक्षा दिल्या. त्यांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागला आणि शेवटी बोर्डाच्या परीक्षा संपल्या की त्यांना सुट्टी मिळेल, असे आम्हाला वाटले. आता प्रवेश परीक्षांची तयारी करावी लागणार. हे न्याय्य नाही, जर गांभीर्याने घ्यायचे नसेल तर बोर्डाच्या परीक्षा कशाला घ्यायच्या? असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा आणि पुण्यातले शैक्षणिक वातावरण यामुळे चांगलेच ढवळून निघणार, असे दिसत आहे.