Pune crime : Officer 420! फूड इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करून हॉटेलमालकाला गंडा; यवत पोलिसांनी दोघांना दाखवला हिसका

केस मिटविण्यासाठी आरोपीने प्रसाद कांचन यांच्याकडून ऑनलाइनरित्या चार लाख 42 हजार 500 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. हॉटेल व्यवसायिक यांना सदरचे अधिकारी हे तोतया अधिकारी असल्याच संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Pune crime : Officer 420! फूड इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करून हॉटेलमालकाला गंडा; यवत पोलिसांनी दोघांना दाखवला हिसका
तोतया अधिकाऱ्यांना यवत पोलिसांकडून अटक
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 12, 2022 | 9:48 AM

दौंड, पुणे : एफएसएसएआय (Food Safety and Standards Authority of India) अधिकारी असल्याचे सांगून एका हॉटेलमालकाला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एफएसएसएआय अधिकारी असल्याचा फोन करून रेस्टॉरंट मालकाला तुमच्या रेस्टॉरंटमधील जेवणामुळे एका महिलेला विषबाधा झाली आहे. असे सांगत केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन चार लाख 42 हजार 500 रुपयांना ऑनलाइन गंडा (Online Cheating) घालण्यात आला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामांकित रेस्टॉरंट कांचन व्हेजला चार लाख 42 हजार 500 रुपयांनी हा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद दत्तात्रय कांचन यांनी यवत पोलीस ठाण्यात (Police Station Yavat) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

कारवाई टाळायची असेल तर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद कांचन यांचे यवत परिसरात कांचन व्हेज नावाचे रेस्टॉरंट आहे. तीन मे रोजी त्यांना मी प्रशांत पाटील आहेत. मुंबई मंत्रालयातून एफएसएसएआय फूड इन्स्पेक्टर असल्याची बतावणी त्याने रेस्टॉरंट मालकाकडे केली. तुमच्या रेस्टॉरंटमधील जेवण केल्यामुळे एका महिलेला विषबाधा झाली आहे. त्यामुळे तुम्हाला केसमध्ये अडकवितो. आमची टीम तुमचे रेस्टॉरंट सील करण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. कारवाई करायची नसेल तर तुम्ही मी सांगेन त्या खात्यात पैसे जमा करा, अशी धमकी त्याने दिली.

हॉटेल मालकाला आला संशय

केस मिटविण्यासाठी आरोपीने प्रसाद कांचन यांच्याकडून ऑनलाइनरित्या चार लाख 42 हजार 500 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. हॉटेल व्यवसायिक यांना सदरचे अधिकारी हे तोतया अधिकारी असल्याच संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी सोलापूर येथून यासंबंधित दोन तोतया फूड इन्स्पेक्टरना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 420चा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

काय आहे एफएसएसएआय?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. FSSAIची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 अंतर्गत करण्यात आली आहे, जो भारतातील अन्न सुरक्षा आणि नियमन यांच्याशी संबंधित एक कायदा आहे.