PDFA : फुटबॉलप्रेमींनो लक्ष द्या..! दोन वर्षांनंतर पुण्यात पुन्हा सुरू होणार सामने, कुठे आणि कधी? वाचा सविस्तर

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील दोन सराव मैदान, एसपी कॉलेज, एसएसपीएमएस आणि इतर मैदानांवर हे सामने होणार आहेत. या वर्षी एकूण 284 संघांनी PDFAमध्ये नोंदणी केली आहे, ही संख्या मागील वर्षी साइन अप केलेल्या 130 संघांपेक्षा दुप्पट आहे.

PDFA : फुटबॉलप्रेमींनो लक्ष द्या..! दोन वर्षांनंतर पुण्यात पुन्हा सुरू होणार सामने, कुठे आणि कधी? वाचा सविस्तर
फुटबॉल (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 7:30 AM

पुणे : कोविडमुळे थांबलेल्या फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहेत. पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनने (Pune District Football Association) ही माहिती दिली आहे. 9 मेपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. फुटबॉल सामन्यांसह युवा आणि बेबी लीगच्या स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत, साथीच्या रोगामुळे (Covid) स्पर्धा आयोजित करणे कठीण होते आणि हे सर्व खेळाडू (Players) आणि इतर सहाय्यक कर्मचार्‍यांचे मोठे नुकसान होते. नवीन कॅलेंडर पीडीएफए लीगने 9 मेपासून सुरू होईल, असे ठरवण्यात आले आहे, असे पीडीएफएचे सचिव प्रदीप परदेशी यांनी सांगितले आहे. प्रस्थापित पीडीएफए लीग आणि इतर वयोगटातील इव्हेंट्ससह, सीझनमध्ये 12-16 वयोगटातील पुणे प्रीमियर युथ लीग आणि तीन स्तरांमध्ये सहा ते 10 योगटातील मुलांसाठी बेबी लीग देखील होणार आहे.

बालेवाडीसह विविध मैदानात होणार सामने

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील दोन सराव मैदान, एसपी कॉलेज, एसएसपीएमएस आणि इतर मैदानांवर हे सामने होणार आहेत. या वर्षी एकूण 284 संघांनी PDFAमध्ये नोंदणी केली आहे, ही संख्या मागील वर्षी साइन अप केलेल्या 130 संघांपेक्षा दुप्पट आहे. 2022-23चा हंगाम लवकरच सुरू करण्यासाठी लीग जुलैपर्यंत पूर्ण होतील, तर बेबी लीग, युथ लीग आणि महिलांच्या सामन्यांसाठी खिडक्यांची योजना आखली जात असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

उत्साहात होणार स्पर्धा

पुणे जिल्हा महिला संघ नाशिक येथे होणाऱ्या आंतरजिल्हा 17 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. कोविडमुळे मागील दोन वर्षांत कोणतेही सामने खेळवता आले नाहीत. अनेक निर्बंध घालण्यात आल्याने या स्पर्धा आयोजित करणे कठीण बनल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र आता पुरेसे लसीकरण तसेच निर्बंधांमध्येही शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धा उत्साहात पार पडतील, असे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.