अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार

FYJC Admission | अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या 67 हजार 131 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर 66 हजार 247 विद्यार्थ्यांचे अर्जांची पडताळणी झाली आहे. येत्या शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात येईल.

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार
अकरावी प्रवेश
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 7:41 AM

पुणे: इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडण्याच्या पर्यायाची मुदत रविवारी रात्री संपली. पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी 75 हजार 749 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. तर जवळपास 58,768 विद्यार्थ्यांची प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आता पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 311 कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी केली. याद्वारे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेशासाठी एक लाख 11 हजार 205 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या 67 हजार 131 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर 66 हजार 247 विद्यार्थ्यांचे अर्जांची पडताळणी झाली आहे. येत्या शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात येईल.

पुणे विद्यापीठाची पीएचडी परीक्षा पुन्हा लांबणीवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 22 ऑगस्ट म्हणजे आज होणार होती. मात्र, आता ही ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ऑनलाईन होणार होती. लॉग इन केल्यापासून पेपर सोडवण्यासाठी दोन तासांचा अवधी देण्यात आला होता. 5 सप्टेंबरलाही हेच वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

(FYJC admission Process in Pune)