AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्राच्या परीक्षांना 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा बहुपर्यायी असून ऑनलाईन पद्धतीने होईल.

पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 8:25 PM
Share

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्राच्या परीक्षांना 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा बहुपर्यायी असून ऑनलाईन पद्धतीने होईल. या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र व इतर अशा एकूण 284 अभ्यासक्रमांसाठी 4 हजार 195 विषयांसाठी ऑनलाईन परीक्षा होत आहे. या परीक्षेआधी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) होणार आहे. 8 ते 10 जुलैदरम्यान ही परीक्षा होईल (SPPU declared exam timetable for 2020-21 educational year).

12 जुलै पासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलंय. या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात येणार आहेत. याप्रमाणे 60 प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. यातील 50 प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील 25 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.

याबाबत परीक्षा व मुल्यमापन मंडलाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, “ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करू नये यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर नमुना दाखल काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येईल. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.” या परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

अजूनही परीक्षा अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना 3 दिवस अर्ज करता येणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षा अर्ज भरता आले नाहीत अशा विद्यार्थ्यांना 12, 13 आणि 14 जुलै रोजी परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. त्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिलीय.

परीक्षेत तांत्रिक दोष झाल्यास तक्रार करता येणार

परीक्षेत लॉग इन न होणे, लॉग आउट होणे, इंग्रजी/ मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे, परीक्षार्थींना परीक्षेच्या वेळी कोविड विषाणू बाधा झालेली असणे, विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी अशा परीक्षा एकाच दिवशी येणे अशी कारणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करता येणार आहे. मात्र प्रत्येक तक्रारीची छाननी करण्यात येईल. अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे हॉल तिकीट किंवा इतर पुरावा देणे गरजेचे असणार आहे.

हेही वाचा :

‘दिरंगाई’ हा एमपीएससीचा आवडता ‘उद्योग’, ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवा; अमित ठाकरेंचा संताप

नोकरीच्या परीक्षेतील पराभव म्हणजे शेवट नसतो, अंधारानंतर प्रकाश दिसतो, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर शिवदीप लांडेंचा युवकांना सल्ला

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

व्हिडीओ पाहा :

SPPU declared exam timetable for 2020-21 educational year

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.