Gopichand Padalkar : तुमच्या मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला तो पैसा अहिल्यादेवींसाठी वापरता का? रोहित पवारांना गोपीचंद पडळकरांचा सवाल

| Updated on: May 30, 2022 | 12:07 AM

त्यांनी अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) जयंतीवरून आणि रोहित पवारांच्या पत्रिका वाटण्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुघल वृत्तीच्या पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

Gopichand Padalkar : तुमच्या मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला तो पैसा अहिल्यादेवींसाठी वापरता का? रोहित पवारांना गोपीचंद पडळकरांचा सवाल
गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली
Image Credit source: tv9
Follow us on

बारामती : पवार घराणं (Sharad Pawar) हे नेहमीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या टार्गेटवर असतं. पवारांवर टीका करण्याची एकही संधी गोपीचंद पडळकर एकही संधी सोडत नाहीत. आज ते बारामतीत बोलत होते. तेव्हाही त्यांनी अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) जयंतीवरून आणि रोहित पवारांच्या पत्रिका वाटण्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुघल वृत्तीच्या पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समजा आपला इतिहास निर्माण करत नाही. राज्यातील लोकांना मला हे सांगायचे आहे की मंदिरावर जेव्हा जेव्हा आक्रमणं झाली. तेव्हा ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी म्हल्लारराव होळकरांनी तेथे मंदिर उभारले होते. आता शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार यांनी चौंडीत काहीतरी गोंधळ व्हावा दंगली व्हाव्या, असे षडयंत्र रचले आहे अशी टीका त्यांनी केली.

पवारांवर थेट हल्लाबोल

दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केलेला पैसा जयंतीला वापरता?

तसेच हे नवाब मलीकांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांनी दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला. आणि तोच पैसा आहिल्यादेवींच्या जयंतीला वापरत आहेत. त्यामुळे आम्ही चौडींच्या ठिकाणी जर वाकडी नजर टाकत आसाला तर आम्ही ते सहण करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच रोहित पवार हे आता पत्रिका घेऊन फिरत होते. आजोबाला पत्रं देत फिरत आहेत. एका घरात राहाता आणि पत्रिका देण्याचे ढोंग करत आहेत, पण आरे काय तो तुझ्या लग्नाची कार्यक्रम आहे का? अशी घणाघाती टीका त्यांनी रोहित पवारांवर केली आहे.

हे सुद्धा वाचा

मटण खाऊन देवाला जातात

तसेच रोहित पवार काण आहेत? कार्यक्रम घेणारे ते काय आहिल्यादेवींचे वंशज आहेत
का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी असे राजकारण करू नये. ईकडे आहिल्यादेवींच्या नावाने प्रेम दाखवतात आणि तिकडे ते मटन खाऊन गणपतीला जातात, अशी घणाघाती टीका त्यांनी शरद पवारांच्या पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिरात न जण्यावर आणि नॉनव्हेजचे कारण सांगण्यावर केली आहे. त्यामुळे हा वादही अजून संपत नाही. तसेच मी पवारांना चारी बाजुने घेरले आहे. मागच्या निवडणुकीत जरी माझे डिपॉजिट जप्त झाले आसले तरी बारामतीकरांना काय मिळालं? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या काळात मी माझी ताकद पवारांना दाखवणार आहे. आता घोडा मैदान दूर नाही, असे म्हणत त्यांनी पवारांना पुन्हा आव्हान दिलं आहे.