जुन्नरमध्ये मुसळधार पाऊस, कुकडी धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात दोन दिवसांत 4.2 टीएमसीची वाढ

| Updated on: Jul 24, 2021 | 11:36 AM

Heavy Rain in Pune | सध्या वडज धरणातून सध्या मिना नदीत 523 इतका क्युकेस वेगाने विसर्ग सुरू आहे. तर पिपंळगाव जागा धरणातुन मृत साठा काढल्याने या धरणात 100 दश लक्ष घनफूट पाणीसाठ्यात वाढ होऊन या धरणात एकुण वजा 798.द.ल.घनफूट (-20.52%) इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जुन्नरमध्ये मुसळधार पाऊस, कुकडी धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात दोन दिवसांत 4.2 टीएमसीची वाढ
कुकडी प्रकल्प
Follow us on

पुणे: गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात 4.2 टीएमसीची वाढ झाली आहे. कुकडी प्रकल्प अंतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात ही वाढ झाली आहे.

सध्या वडज धरणातून सध्या मिना नदीत 523 इतका क्युकेस वेगाने विसर्ग सुरू आहे. तर पिंपळगाव जागा धरणातुन मृत साठा काढल्याने या धरणात 100 दश लक्ष घनफूट पाणीसाठ्यात वाढ होऊन या धरणात एकुण वजा 798.द.ल.घनफूट (-20.52%) इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

या प्रकल्पातंर्गत धरणाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने तसेच परीसरात पावसानेच दडी मारल्याने दुष्काळी संकट पुन्हा कोसळणार तर नाही ना?, या चिंतेने सर्वसामान्य नागरीक व बळीराजा ग्रासला होता. मात्र, मुसळधार पावसाने या सर्व चिंता मिटवल्या आहेत.

पवना धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली. सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसात 579 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात ताम्हिणी घाटासह 13 ठिकाणी ढगफुटी

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात जवळपास 13 ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ग्रामीण भागात रडारयंत्रणा नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही. परंतु, संबंधित परिसरातील पावसाचे (Rain) एकूण स्वरुप पाहता राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा हवामान आयआयटीएमचे हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

ताम्हिणी घाटात 468 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिपळूण आणि महाबळेश्वरमध्ये अनुक्रमे 400 आणि 480 मिमी पावसाची नोंद झाली. एका तासात 100 मी.मी पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते, असे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Weather update today : कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे, IMD च्या अंदाजाने धाकधूक कायम

Satara Rain | साताऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद, कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?