AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे. (Raigad Taliye Landslide)

VIDEO: काल इथे गाव होतं... डोंगराच्या आडोशाला गेले आणि...; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर
Mahad landslinde
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 5:44 PM
Share

महाड: महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे. कालपर्यंत डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनून राहिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांचे संसार मातीला मिळाले आहेत. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरू असून मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ही घटना नेमकी कशी घडली? या दुर्घटनेत किती लोक ठार झाली? आदी प्रश्नांचा प्रत्यक्ष साक्षीदारांच्या हवाल्याने घेतलेला हा मागोवा. (Mahad landslide: A look at how the Taliye Village landslides occurred)

‘टीव्ही9 मराठी’ला सर्वात आधी या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आमची टीम पाऊस अंगावर झेलत आणि चिखल तुडवत तळीये गावात दाखल झाली. गावातील विदारक दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. लोकांचा आक्रोश, मातीचा ढिगारा उपसण्यात येत असलेला अडथळा, घरांवर कोसळलेले दगड आणि मोठं मोठी झाडं… त्यामुळे संपूर्ण गावच ओसाड वाटत होता. आमच्या टीमने काही प्रत्यक्षदर्शींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळाली ती धक्कादायक आणि काळीज पिळवटणारी माहिती.

कामावर गेले ते वाचले

काल गुरुवारी चार साडे चारला ही घटना घडली. पावसामुळे लोक घरात होते. पाऊस जोरात आल्यामुळे लोक घरातून बाहेर पडले नाहीत. नंतर पाऊस कमी झाल्यावर काही लोक घरातून बाहेर पडली. पण पाणी अधिक असल्याने काही लोकांनी त्यातून जाणं टाळलं. या दुर्घटनेत एकूण 30 घरे दबली गेली. अख्खं गाव गेलं. 80-90 लोकं गावात राहत होते. जे कामावर गेले होते तेच शिल्लक राहिले. बाकी सर्व दरडीखाली दबले गेले. आम्ही प्रशासकीय यंत्रणांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण नेटवर्कमुळे संपर्क झाला नाही, असं प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितले.

45 घरांचं गाव, 35 घरे जमीनदोस्त

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण त्यांना काय माहीत काळ इथेच लपून बसला. जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. सर्व गेले. घरेही जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल झाला होता, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. या गावात 40-45 घरे होती. त्यातील 35 घरे जमीनदोस्त झाली आहेत, असंही त्याने सांगितलं.

जोराचा आवाज आला…

तर दुसऱ्या एका व्यक्तीची बहीण आणि भावोजी या दुर्घटनेत दगावली. भावोजी संपत पोळ आणि बहीण अनिता संपत पोळ यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याचा भाचा मात्र सुदैवाने बचावला. तो म्हणतो. जोराचा आवाज आला म्हणून गावकऱ्यांची पळापळ झाली. पावसामुळे सर्वजण एकाजागेवर जमा झाले. पाऊस जोराचा येत होता. तेवढ्यात काळाने झडप घातली आणि सर्वजण दरडीखाली दबले गेले, असं त्याने सांगितलं. (Mahad landslide: A look at how the Taliye Village landslides occurred)

संबंधित बातम्या:

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Raigad Satara landslide live : महाड, पोलादपूर आणि साताऱ्यात दरडी कोसळल्या, आतापर्यंत 71 मृत्यू

Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

(Mahad landslide: A look at how the Taliye Village landslides occurred)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.