गडहिंग्लज आणि पारनेर कारखान्यात घोटाळा, उद्या ईडीला पुरावे देणार; किरीट सोमय्यांची माहिती

आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाला आहे. उद्या या संदर्भातील सर्व पुरावे ईडीकडे देऊन तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. (i will meet ED officer for gadhinglaj sugar factory corruption, says Kirit Somaiya)

गडहिंग्लज आणि पारनेर कारखान्यात घोटाळा, उद्या ईडीला पुरावे देणार; किरीट सोमय्यांची माहिती
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 3:34 PM

पुणे: आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाला आहे. उद्या या संदर्भातील सर्व पुरावे ईडीकडे देऊन तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांच्या या इशाऱ्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (i will meet ED officer for gadhinglaj sugar factory corruption, says Kirit Somaiya)

किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही 9मराठी’शी बोलताना किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाला आहे. उद्या या संदर्भातील सर्व पुरावे ईडीकडे देऊन तक्रार करणार आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी गडहिंग्लज साखर कारखाना कसा काबीज केला, हसन मुश्रीफ यांनी बेनामी कंपनीला कसा दिला हे सांगणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ईडीशी चर्चा करून सर्व पुरावेही सादर करणार असल्याचं ते म्हणाले.

पारनेर कारखान्याचा भ्रष्टाचारही उघड करणार

मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे. तसेच पारनेर कारखान्यात पवार यांचे जवळचे मित्र अतुल चोरडिया यांनी 23 कोटी दिले. कोणी गडहिंग्लजला पैसे देतं, कोणी पारनेरला. सगळे उद्योगपती पवार कुटुंबियांचे मित्र आहेत का? याबाबत ईडीसोबत चर्चा करणार. जरंडेशवर नंतर पारनेरच्या घोटाळ्याचेही पुरावे देणार आहे.

तर अंदमान निकोबारला पाठवलं असतं

चंद्रकांत पाटील हे सोमय्यांचे मास्टर माइंड आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राची जनता ही खरी मास्टरमाइंड आहे. घोटाळेबाज सरकारचा बुरखा फाडायचा हे जनतेने ठरवलं आहे. महाराष्ट्रात आता क्रांती येत आहे, असं ते म्हणाले. माझी थोडी जरी चूक असती तर ठाकरे सरकारने मला अंदमान निकोबारला पाठवलं असतं, असा दावाही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंची दडपशाही

“हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.” “ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो. मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.”, असंही सोमय्या म्हणाले. (i will meet ED officer for gadhinglaj sugar factory corruption, says Kirit Somaiya)

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील चार नेत्यांचे चार जावई रडारवर, किरीट सोमय्यांनी वात पेटवली!

मुंबई पालिकेवर डोळा? भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा, कोण आहेत उमेदवार संजय उपाध्याय?

‘दादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर’, मुश्रीफांचा दावा, आता खुद्द चंद्रकांत पाटलांनी खरं काय ते सांगितलं!

(i will meet ED officer for gadhinglaj sugar factory corruption, says Kirit Somaiya)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.