‘दादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर’, मुश्रीफांचा दावा, आता खुद्द चंद्रकांत पाटलांनी खरं काय ते सांगितलं!

मुश्रीफांच्या दाव्यावर आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफांना अशी कोणतीही ऑफर नव्हती, असं स्पष्ट करत मुश्रीफ आता ड्रामा करत असल्याचा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.

'दादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर', मुश्रीफांचा दावा, आता खुद्द चंद्रकांत पाटलांनी खरं काय ते सांगितलं!
चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ

पुणे :  मला चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करुन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मुश्रीफांच्या या दाव्यावर आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफांना अशी कोणतीही ऑफर नव्हती, असं स्पष्ट करत मुश्रीफ आता ड्रामा करत असल्याचा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.

हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती

हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती, असं स्पष्ट करताना एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

हसन मुश्रीफांनी ड्रामा बंद करावा

कारवाई झाल्याने आणि घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरु आहे. अमुक-तमुक करणार… माझे हितचिंतक रस्त्यावर येणार,  टीव्ही 9 ला सोबत घ्यायचं… कुठलीतरी परिस्थिती दाखवायची, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर – हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असा टोला हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

कुणालाही देण्याकरिता आमचे ऑफर मैदानात पडलेले नाहीत, फडणवीसांचा पलटवार

हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, असा सवाल करताना असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालीही देण्याकरिता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

घोटाळ्याच्या आरोपावरुन लक्ष हटविण्यासाठी मुश्रीफांची दिशाभूल

मुश्रीफ आता काहीतरी बोलतायत. घोटाळ्याच्या आरोपावरुन लक्ष हटविण्यासाठी त्यांनी आता बाजपची ऑफर होती, असं सांगितलं आहे. त्यांनी अशी कोणतीही कुणीही ऑफर दिलेली नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

हसन मुश्रीफ यांचा नेमका गौप्यस्फोट काय?

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

(BJP Chandrakant Patil Comemnt on Maharashtra Minister hasan mushriff Claim BJP Offer)

हे ही वाचा :

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचा पलटवार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI