महेश मोटेने मागितली राज ठाकरेंची माफी, तोंडाला काळं फासताच ढसाढसा रडला; थेट लोटांगण घेतलं!
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर महेश मोटे यांनी अखेर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सपशेल माफी मागितली आहे. मनसेचे राज ठाकरे यांच्या विरोधात महेश मोटे याने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर महेश मोटे यांनी अखेर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सपशेल माफी मागितली आहे. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते संतापले होते.त्यानंतर आज अखेर मनसेच्या पुणे येथील कार्यालयात जाऊन महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य मागे घेत स्वत:च्या तोंडाला काळे फासत माफी मागितली आहे.
महेश मोटे याने काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. आता सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर महेश मोटे याने आज पुण्यातील मनसेच्या कार्यालयात जाऊन स्वत: व्हिडीओ बनवून राज ठाकरे आणि मनसेची सपशेल माफी मागितली आहे. आपण राज ठाकरे यांच्याबद्दल बोललो होतो की फार मोठी चूक होती. त्या चुकीबद्दल मी त्यांची माफी मागत आहे असे महेश मोटे याने म्हटले आहे. शुभम दादा असतील मनसेचे लोक असतील त्या सर्वांची आपण माफी मागतो असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.
महेशच्या तोंडाला काळे फासले
अनावधाने राज ठाकरे यांच्याबद्दल आपण थोडे चुकीचे बोललो. रिल्सच्या नादात मी सगळे हे केले. आता मी सर्वांची माफी मागतो. कोणच्या नादी लागा पण यांच्या नादाला लागू नका असेही महेश मोटे यानी म्हटले आहे. या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात महेश मोटे याच्या तोंडाला काळे फासलेले दिसत आहे. महेश मोटे स्वत:ची चप्पल डोक्यावर ठेवून उठा बशा काढताना या व्हिडीओत दिसत आहे. तसेच त्याने यावेळी मनसेच्या शाखेत जाऊन राज ठाकरे यांच्या फोटो समोर साष्टांग दंडवत घातली माफी मागितली आहे. माझ्या सारख्या माणसाने उठायचे आणि काही बोलायचे हे बरोबर आहे. मी मनसेचे माफी मागतो असेही रिल्स स्टार महेश मोटे यांनी म्हटले आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
वादग्रस्त विधाने करुन प्रसिद्धी
महेश मोटे हे रिल स्टार असून त्यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये करुन आपले फॉलोअर वाढवले होते. त्याने अनेकदा असे प्रकार प्रसिद्ध होण्यासाठी केले आहेत. त्याने यावेळी थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आज त्याने पुणे येथील मनसेच्या कार्यालयात जाऊन माफीनामा सादर केला आहे.