कार्तिक संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात ; महाराष्ट्रातून वारकरी आळंदीत दाखल

| Updated on: Nov 27, 2021 | 10:41 AM

इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या जवळच्या दोन मजली दर्शनबारी उभारली आहे. कार्तिकी यात्रेच्या दरम्यान घातपाताची शक्यता होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा, तपासणी यंत्रणा बसवली आहे.

कार्तिक संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात ; महाराष्ट्रातून वारकरी आळंदीत दाखल
Kartik Sanjeevan Samadhi ceremony
Follow us on

आळंदी- ‘ज्ञानोबा, माऊली तुकाराम’ हा जयघोष ऐकण्यासाठी व्याकुळ झालेली इंद्रायणी तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गजबजली आहे.  आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळ्याला आज पासून सुरुवात होत आहे.  कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीदिन सोहळा संपन्न होत आहेत. यंदाचे सोहळ्याचे हे 725 वर्ष आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत.  दोन वर्षानंतर इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे

या कार्तिकी एकादशीच्या सोहळासाठी नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या जवळच्या दोन मजली दर्शनबारी उभारली आहे. कार्तिकी यात्रेच्या दरम्यान घातपाताची शक्यता होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा, तपासणी यंत्रणा बसवली आहे. देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि आळंदी पोलिसांच्यावतीने महाद्वार, पानदरवाजा, दर्शनबारी, पंखा मंडप, वीणामंडप, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, इंद्रायणी घाट, भक्ती सोपान पूल याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये महिला पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे.

असा होईल कार्यक्रम सोहळा

गुरु हैबतबाबा पायरीच्या पूजनाने सोहळ्यास सुरुवात
मंगळवार (दि. 30) रोजी मुख्य पहाटपूजा पार पडेल
गुरुवार (दि. 2 डिसेंबरला) माऊलींचा संजीवन सोहळा संपन्न होईल.

या नियमाचे पालन आवश्यक

हनुमान दरवाजा आणि गणेश दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे, वारकऱ्यांना बंधनकारक आहे.
सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याने मास्क लावणे अनिवार्य आहे.

 

मावळमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीला मोठा अपघात ; 20 जखमी , दोन वारकऱ्यांचा मृत्यू

Tara Sutaria | ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’, सोशल मीडियावर दिसला तारा सुतारियाचा घायाळ करणारा अंदाज!

नियमित कोरफडीचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा याबद्दल सविस्तर!