Ketan Agrawal Murder Case: सिया गोयल तुरुंगातून बाहेर येणार?, केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठा ट्विस्ट,आरोपीच्या वकिलांकडून कोर्टात मोठा युक्तीवाद
Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. सध्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरोपी सिया गोयलच्या वकिलांकडून याप्रकरणात मोठा युक्तिवाद करण्यात आला आहे.

Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणाने राज्याचं नाही तर देश हादरला होता. लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्याच्या काठावरून केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलल्याचा आरोप होता. केतनच्या खून प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर केतनच्या हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात दोघांविरोधात पोलिसांनी भक्कम डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब घेतले होते. सध्या या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरोपी सिया गोयलच्या वकिलांकडून याप्रकरणात मोठा युक्तिवाद करण्यात आला आहे.
सियाच्या वकिलांचा युक्तीवाद काय?
याप्रकरणात सिया गोयल हिने जामीन अर्ज दाखल केला आहे. सियाच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला आहे. केवळ फोन कॉल अथवा चॅटिगच्या आधारे हत्येचा कट सिद्ध होऊ शकत नाही, असा बचाव आरोपीकडून करण्यात आला. सिया अजून तरूण आहे. खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यासाठी अजून बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे सियाला जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.
सियाच्या वकिलांनी जामीन अर्जात एकूणच तपासावर चार प्रमुख आक्षेप घेतले आहे. केतनच्या कुटुंबियांनी घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा ज्या ठिकाणाहून तो पडल्याचा दावा करण्यात येत आहे, तिथून तो पडणे शक्य नसल्याचा संशय व्यक्त केल्याचा युक्तीवाद सुनावणीवेळी करण्यात आला. तर केतनच्या चुलत्याने मित्राकडून सिया आणि चेतन यांच्या संबंधीची माहिती मिळाल्यानंतर संशया आदारे तक्रार करण्यात आल्याचा बचाव पक्षाने केला. सिया आणि चेतन यांच्यातील संभाषण, चॅट म्हणजे हत्येचे नियोजन असल्याचे सिद्ध होत नाही, असा तिसरा मुद्दा समोर आणला. आरोपांच्या कथित जबाबांव्यतिरिक्त सरकारी पक्षाने स्वतंत्र आणि ठोस पुरावे सादर केला नसल्याचा चौथा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तर केतनचा मृत्यू हा फोटो काढताना झालेला अपघात होतो, असाही दावा कोर्टासमोर करण्यात आला.
17 नोव्हेंबर रोजी सुनावणीची शक्यता
प्रकरणात पोलिसांनी 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. डिजिटल पुराव्यांसह 3 महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सिया गोयलच्या जामीन अर्जावर 17 नोव्हेंबर रोजी सुनावणीची शक्यता आहे. आता या जामीन अर्जावर काय निकाल येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 18 जून 2026 रोजी लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली होती. सुरुवातीला हा अपघात मानल्या जात होता. पण पोलीस तपासात हा हत्येचा कट असल्याचे समोर आले होते.