Pune Leopard attack : पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले सुरूच, खेड आणि आंबेगावातल्या ग्रामस्थांवर केलेल्या हल्ल्यात दोन जखमी

शेतात बाजरीला पाणी देत असताना बिबट्याने अचानक ओमकारवर हल्ला केला. यानंतर ओमकारने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक तिथे आल्याने ओमकारचा जीव थोडक्यात वाचला. तर जऊळके येथे 50 वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे.

Pune Leopard attack : पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले सुरूच, खेड आणि आंबेगावातल्या ग्रामस्थांवर केलेल्या हल्ल्यात दोन जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात आंबागावातील थोरांदळेत तरूण जखमी
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 11:54 AM

खेड, पुणे : खेड तालुक्यात माणसांवर बिबट्याचे हल्ले (Leopard attack) सुरूच आहेत. जऊळके येथे 50 वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे. लता बोऱ्हाडे असे हल्ला झालेल्या 50 वर्षीय महिलेचे नाव आहे. चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात (Sasoon hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे शेतात पिकांना पाणी देत असताना 17 वर्षीय तरुणावर बिबट्याने पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला असून या हल्ल्यात ओमकार टेमगिरे हा 17 वर्षीय तरुण थोडक्यात बचावला आहे. दरम्यान, मागील दोन दिवसात बिबट्याचा माणसांवरील हा तिसरा हल्ला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. वनविभागाने (Forest department) पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आंबेगावातील प्रकार

आंबेगावात बिबट्याने केलेल्या या हल्लात ओमकारच्या चेहऱ्यावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतात बाजरीला पाणी देत असताना बिबट्याने अचानक ओमकारवर हल्ला केला. यानंतर ओमकारने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक तिथे आल्याने ओमकारचा जीव थोडक्यात वाचला. सध्या ऊसाचे क्षेत्र घटल्याने बिबट्याचा वावर हा मानवी वस्तीत वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

काही तासांच्या अंतराने घडल्या दोन घटना

दोन दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी (10) जऊळके लगतच्या रेटवडी गावात दोन बिबट्यांनी दीड तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांवर प्राणघातक हल्ला केला होता. यातील एक महिला पुण्यातील ससून रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत असताना याच परिसरात आज सकाळी तिसरा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिक पुरते घाबरून गेले आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी ग्रामस्थ अधिक दहशतीत राहत आहेत. याठिकाणी पिंजरे बसवावेत, तसेच वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात  तरूण जखमी