धक्कादायक, नोकरीचे आमिष देऊन अडीच हजार महिलांना नेले आखातामध्ये

पुणे शहरातील अनेक महिलांची फसवणूक झाली आहे. विदेशातील नोकरीचे ऑफर असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. एकूणअडीच हजार महिलांची फसवणूक झाल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेय.

धक्कादायक, नोकरीचे आमिष देऊन अडीच हजार महिलांना नेले आखातामध्ये
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:54 AM

प्रदीप कापसे, पुणे : विदेशातील नोकरीचे ऑफर असल्याचे सांगत राज्यातील अडीच हजार महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यात पुणे शहरातील अनेक महिला असल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याचे आवाहन केलेय. यासंदर्भात केंद्र सरकारची मदत घेऊन या महिलांची सुटका करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

नेमके काय घडले

हे सुद्धा वाचा

विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक जणांची फसवणूक केली जाते. आता राज्यातील अडीच हजार महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उघडकीस आणला आहे. राज्यातील या सर्व महिला ओमानमध्ये अडकल्या आहेत .या महिलांना चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून ओमानमध्ये नेण्यात आले आहे. त्यात पुणे शहरातील अनेक महिला असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना केले आवाहन

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. त्यांनी या प्रकारात लक्ष देऊन केंद्र सरकारच्या मदतीने त्या महिलांची सुटका करावी, अशी मागणी केलीय.

भारतीय तरुण व तरुणींना आकर्षक नोकऱ्यांचे प्रलोभन देऊन फसवणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. या नोकर्‍या बनावट कॉल सेंटर्स आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीतद्वारे ऑफर केल्या जात आहेत. दुबई आणि भारतातील एजंटांकडून नोकऱ्यांच्या नावाखाली सोशल मीडिया जाहिरातींद्वारे त्यांची फसवणूक केली जात आहे.

सुषमा अंधारे प्रकरात केली नाराजी व्यक्त

गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची तक्रार पोलिसांनी दाखल करून न घेतल्याने महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गृह खात्यावरती नाराजी व्यक्त केलीये.  महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतके वेळ पोलीस स्टेशनला बसवावं लागतं, त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांना आयोगाला तक्रार करावी लागली हे दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर तक्रार जर दाखल करून घेत नसेल तर निंदनीय याची खंत त्यांनी व्यक्त केलीये.

दिवसेंदिवस जाहीर सभांमधून एखाद्या महिलेवर टीका करताना अतिशय पातळी सोडून भाषा वापरण्याचं प्रमाण वाढलेय. यासंदर्भात महिलांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेऊन तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देत असल्याच त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.