AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kolhapur Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापूरमध्ये भाजपला यश; 13 पैकी 11 जागांवर कमळ

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल कोल्हापुरातून आला आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp win 11 seats in kolhapur)

kolhapur Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापूरमध्ये भाजपला यश; 13 पैकी 11 जागांवर कमळ
| Updated on: Jan 18, 2021 | 9:37 AM
Share

कोल्हापूर: ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल कोल्हापुरातून आला आहे. कोल्हापुरात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील 13 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर हातकणंगले येथील पाडळी ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व 11 जागा माजी मंत्री विनय कोरे यांच्या आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे कोरे यांचा पाडळीतील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp win 11 seats in kolhapur)

कोल्हापुरातील हातकणंगले येथील पाडळी ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्वच्या सर्व 11 जाागांचा निकाल जाहीर झाला आहे. या सर्व जागा जिंकण्यात जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या गोराई ग्रामविकास आघाडीला यश मिळाले आहे. त्यामुळे पाडळी ग्रामपंचायतीवर कोरे यांचं वर्चस्व अबाधित असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. या ठिकाणी कोरे यांच्या आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेचं मोठं आव्हान होतं. मात्र मतदारांनी कोरे यांच्या आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. या निवडणूक निकालानंतर कोरे समर्थकांनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला. यावेळी गावकऱ्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. सर्वच्या सर्व जागा जिंकल्याने कोरे यांनीही समाधान व्यक्त केलं. तर, कोल्हापुरात कमळ फुललं आहे. कोल्हापुरात भाजपने विजयी वाटचाल सुरू केली आहे. भाजपने 13 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

कराडचा कौल भाजपकडे

तर शिरोळ गणेशवाडी ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व निर्माण केलं आहे. ही ग्रामपंचायत भाजपने एकहाती जिंकली आहे. तसेच कराड तालुक्यातील पहिला निकाल हाती आला आहे. कराड तालुक्यातील खुबी गावात भाजपच्या अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाला आहे. भोसले यांच्या पॅनलने 13 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत.

काका विरुद्ध पुतण्या

सोलापूरमधील अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात चुरस पाहताना दिसत आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती आहे सत्ता. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिले आहे. येथील 17 जागां पैकी एक जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले आहे. त्यामुळे अकलूजच्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp win 11 seats in kolhapur)

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | सातारा, सोलापुरात मतमोजणीला सुरुवात

(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp win 11 seats in kolhapur)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.