Honeybee attack | सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत, पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला

| Updated on: Mar 28, 2022 | 7:41 AM

भटकंतीसाठी गेलेल्या पुण्यातील आयटी कंपनीच्या तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. तरुणांनी धूम्रपान केल्याने त्याचा धूर मोहोळापर्यंत पोहचल्याचं बोललं जात आहे. यामुळेच मधमाश्यांनी तरुण आणि तरुणीवर हल्ला चढवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Honeybee attack | सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत, पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला
पुण्यात तरुणांवर मधमाशांचा हल्ला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

पुणे : भटकंतीला गेलेल्या पुण्यातील आयटी कंपनीतील (IT Company) तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांनी हल्ला (Honey Bee attack) चढवल्याचा प्रकार समोर आला आहे. धूम्रपान केल्याने त्याचा धूर मोहोळापर्यंत पोहचला आणि मधमाश्यांनी तरुण आणि तरुणीवर हल्ला चढवल्याची माहिती आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळा परिसरातील कातळदरा येथे ही घटना घडली. रविवारी भटकंती करण्यासाठी गेलेल्या आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यानी हल्ला चढवला होता. दुखापतग्रस्त तरुण-तरुणींना उपचार करुन सोडून देण्यात आले.

नेमकं काय घडलं?

भटकंतीसाठी गेलेल्या पुण्यातील आयटी कंपनीच्या तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. तरुणांनी धूम्रपान केल्याने त्याचा धूर मोहोळापर्यंत पोहचल्याचं बोललं जात आहे. यामुळेच मधमाश्यांनी तरुण आणि तरुणीवर हल्ला चढवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भटकंतीला गेलेल्या सात जणांना चावा

भोसरी येथील अकरा जणांचा ग्रुप मावळमध्ये भटकंती करण्यास गेला होता. यापैकी सात जणांचा मोहोळातील मधमाशांनी कडाडून चावा घेतला. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळा परिसरातील कातळदरा येथे रविवारी ही घटना घडली.

जखमी तरुण-तरुणींवर रुग्णालयात उपचार

शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीवन रक्षक संस्था यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ मदत केली. जखमी तरुण-तरुणींवर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गुडघेदुखी दूर करण्यासाठी चक्क मधमाशीला डंक करु द्यायचा? खडसेंची ही थेरेपी एकदा बघाच

Video | दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच