Pune Metro Tax |आता 1 एप्रिलपासून पुणेकरांना बसणार मेट्रो कराचा भुर्दंड ; घराच्या किंमती वाढणार

| Updated on: Mar 25, 2022 | 10:12 AM

मेट्रो सेसच्या स्थगितीचा कालावधी संपुष्टात येताच एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू होईल . याबरोबरच 1 एप्रिलपासून नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू होणार असल्याने घराच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामन्य नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही बसणार आहे.

Pune Metro Tax |आता 1 एप्रिलपासून पुणेकरांना बसणार मेट्रो कराचा भुर्दंड ; घराच्या किंमती वाढणार
Pune Metro
Image Credit source: twitter
Follow us on

पुणे – पुण्यात नुकताच मेट्रो प्रकल्पातील (Pune Metro Project)काही किमीची टप्पा सुरु झाला आहे. शहरात मेट्रो पूर्णक्षमतेने तयार होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र तरीही येत्या 1 एप्रिलपासून पुणेकरांना एक टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड (Metro Tax) सहन करावा लागणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी येत्या 1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना एक टक्का मेट्रो कर द्यावा लागेल. त्यासंदर्भातील स्वतंत्र आदेश गुरुवारी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने (Registration Stamp Duty Department)काढले. ज्या शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे, तेथे राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती.

घराच्या किंमती वाढणार

मेट्रो सेसच्या स्थगितीचा कालावधी संपुष्टात येताच एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू होईल . याबरोबरच 1 एप्रिलपासून नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू होणार असल्याने घराच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामन्य नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही बसणार आहे.

मेट्रो कराला स्थगित द्या

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन झाले. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील केवळ काही किमी अंतरात मेट्रो सुरु झाली आहे. याबरोबरच संपूर्ण मेट्रो सुरु होण्यासही जास्त कालावधी लागणार आहे. या गोष्टी लक्षात घेत मेट्रो अधिभार वसुली किमान एक आणखी एक वर्षेतरी स्थिगित करावी अशी मागणी बांधकाम व्यावसायिक संघटनांनी केली आहे.

यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी

Aurangabad | नाथषष्ठीच्या उत्सवात खिसेकापू आणि मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट, 25 भामट्यांना पोलिसांच्या बेड्या!

Watermelon: शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळलं अन् बाजारभावाचं सूतही जुळलं, ठोक विक्रीपेक्षा किरकोळ विक्रीवर भर