पाटस ते लोणी काळभोर मार्गाचा समावेश ‘संत तुकाराम महाराज भक्ती मार्गा’मध्ये करावा, राहुल कुल यांची मागणी
दौंड तालुक्यातील पाटस ते हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी गडकरी यांच्याकडे केली.

पुणे : दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी आज (30 सप्टेंबर) केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी दौंड तालुक्यातील पाटस ते हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी गडकरी यांच्याकडे केली.
वाहतुकीस होणारा व्यत्यय टाळण्यासाठी निर्णय घ्यावा
संत तुकाराम महाराज पालखीमध्ये हजारो वारकरी बांधवांचा समावेश असतो. त्यामुळे सुरक्षितता, भविष्यातील वाढती वाहतुक व पालखी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीस होणारा व्यत्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा असे, कुल यांनी आपल्या मागणीमध्ये म्हटले आहे.
वारकरी बंधू, भगिनींना आवश्यक सुविधा पुरवाव्यात
तसेच कवडीपाट, लोणी काळभोर ते पाटस या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाला गती मिळावी. या मार्गामध्ये “भक्ती मार्गाच्या” धर्तीवर वारकरी बंधू भगिनींसाठी विविध आवश्यक सुविधा उभारण्यात याव्यात, अशीदेखील मागणी कुल यांनी गडकरी यांच्याकडे केली.
खर्डा ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम रखडले, रोहित पवार- नितीन गडकरी भेट
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गामधील खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले 114 कि. मी. चे काम जलदगतीने सुरु करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यांसारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे. मात्र खर्डा ते कुर्डुवाडीपर्यंतचा पुढील भाग अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्यात यावा, अशी विनंती रोहित पवार गडकरी यांच्याकडे केली होती.
इतर बातम्या :
VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना
(MLA Rahul Kul meets Nitin Gadkari demands road from Patas to Loni Kalbhor should include in Sant Tukaram Maharaj Bhakti Marg)