AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना

वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिसात हा प्रकार घडला. गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलीस बोनेटवर चढला.

VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना
कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 7:31 PM
Share

मुंबई : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला. गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलीस बोनेटवर चढला. तर चालकाने देखील संबंधित वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच चालत फरफटत पुढे नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पुढे काही स्थानिकांनी गाडी थांबवत बोनेटवरुन पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवलं. पण त्यानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार तिथे आली. संबंधित कार चालकाने ही वीरा देसाई रोडकडून जेपी रोडच्या दिशेला उजवे वळण घेतली. पण तिथे त्या मार्गाला नो एन्ट्री होती. पण तरीही कार चालकाने त्या दिशेला गाडी वळवली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गुरव यांनी गाडी चालकाला अडवलं.

पोलिसाला गणेश चौकापर्यंत फरफटत नेलं

पोलिसाने अडविल्यानंतरही कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे गुरव यांनी त्याला थांबविण्यासाठी कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कारचालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. गाडीच्या बोनेटवर पोलीस असतानाही त्याने गाडी पळवली. ती गाडी त्याने आझाद मैदान येथून त्यांना गणेश चौकापर्यंत फरफटत नेलं. विशेष म्हणजे स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारचालक तिथे थांबला. यावेळी कारचालक पोलिसाला उतरवत पळून गेला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर पोलीस त्या कारचालकाच्या शोधात होते. या दरम्यान संबंधित गाडी ही जुहू गल्ली येथे आढळली. पोलिसांनी कार आणि कार चालकाला ताब्यात घेतलं. संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा प्रत्यक्षदर्शींनी व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

विनामास्क बाईकवर फिरणाऱ्या तरुणाचा मुजोरपणा, पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये देखील अशीच घटना समोर आली होती. कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के त्यांच्या कर्मचारी पथकासोबत कर्तव्य बजावित होते. विनाकारण फिरणारे आणि मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक विनामास्क बाईकस्वार पोलिसांना येताना दिसला. पोलीस अधिकारी म्हस्के यांनी त्या बाईकस्वाराला थांबविण्याच्या प्रयत्न केला. त्यांना न जुमानता बाईकस्वार म्हस्केंना रस्त्यावर फरफटत लांबवर घेऊन गेला.

या घटनेत म्हस्के यांच्या डोळ्यासह हातापायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात पोलीस घेऊन गेले. त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी मुजोर बाईकस्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाडेघरचा राहणारा आहे. तो पानटपरी चालक आहे. तो विना मास्क फिरत होता. पोलीस त्याची अँटीजेन टेस्ट करणार आहेत. या भीतीने त्याने पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यावर फरफटत नेले.

हेही वाचा :

लग्नानंतर दीराकडून वारंवार बलात्कार, गैरकृत्याला नवऱ्याची साथ, मुलीच्या जन्मानंतर पतीकडून भावासोबत लग्न लावून देण्याचा घाट

ज्यांच्या सहीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या त्या कैलाश गायकवाड यांची ईडीकडून चौकशी

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.