लग्नानंतर दीराकडून वारंवार बलात्कार, गैरकृत्याला नवऱ्याची साथ, मुलीच्या जन्मानंतर पतीकडून भावासोबत लग्न लावून देण्याचा घाट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 6:24 PM

ती-पत्नी आणि दीर-भावजयी यांच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातून समोर आली आहे. आरोपी दीर हा पीडितेला तिचं लग्न झाल्यापासून वारंवार छळत होता. त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

लग्नानंतर दीराकडून वारंवार बलात्कार, गैरकृत्याला नवऱ्याची साथ, मुलीच्या जन्मानंतर पतीकडून भावासोबत लग्न लावून देण्याचा घाट
एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार

भोपाळ : पती-पत्नी आणि दीर-भावजयी यांच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातून समोर आली आहे. आरोपी दीर हा पीडितेला तिचं लग्न झाल्यापासून वारंवार छळत होता. त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून पीडितेने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे दीराने हा सर्व प्रकार पीडितेच्या पतीच्या संमतीनुसार केला. तसेच पीडितेच्या पतीने दीराला काही बोलण्याऐवजी पीडितेलाच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच पीडितेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या पतीने दीरासोबत लग्न लावून देण्याचा हट्ट धरला. या सगळ्या घृणास्पद अत्याचाराला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात जावून आपल्या व्यथा मांडल्या.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचं 6 मार्च 2018 रोजी मुरैयाच्या आदर्श कॉलनीत राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. लग्नापासूनच तिच्या पतीने तिच्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नाहीत. दोघं घरात वेगवेगळ्या खोलीत राहत होते. यादरम्यान त्याच साली 13 सप्टेंबरला महिलेचा पती रात्रीच्या वेळी तिच्या खोलीत शिरला. त्याने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने मदतीची याचना करत आरडाओरड केली. यावेळी पीडितेचा पती तिथे आला. त्याने आपल्या पत्नीला गप्प राहण्यास सांगितलं. तसेच जास्त आरडाओरड केलं तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करु, असं पीडितेचा पती तिला म्हणाला.

आरोपी दीराने पीडितेचे आपत्तीजनक व्हिडीओ बनवला

त्या दिवसांपासून पीडित महिलेसोबत दररोज तसं घडायला लागलं. पण पीडिता पतीच्या दबावाखाली शांतपणे सोसत राहिली. पीडितेचा दीर तिच्यावर दररोज अत्याचार करत होता. आरोपी दीराने पीडितेवर अत्याचार करत असताना आपत्तीजनक व्हिडीओ देखील बनवला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत त्याने महिलेवर वारंवार अत्याचार केला. आरोपीच्या अत्याचारातून पीडितेने एका मुलीला जन्म दिला.

आरोपींविरोधात गु्न्हा दाखल

या सगळ्या घडामोडींनंतर आता पीडितेचा पती तिचं लग्न त्याच्या लहान भावासोबत करण्याचा घाट घालत आहे. तो जबरदस्ती ते लावून देण्याचा प्रयत्न करतोय. अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत पती आणि दीराविरोधात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित घटनेची गांभिर्याने दखल घेत पती आणि दीराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात तर पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बाप आणि लेकीचं फार वेगळं भावनिक नातं असतं. हे नातं खूप महान आणि मोठं असतं. ते शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. पण अहमदनगर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपली वाटचाल आता नेमकी कोणत्या दिशेकडे सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

पीडितेची आई गावी गेली असताना पित्याकडून कृत्य

पीडित 11 वर्षीय चिमुकलीची आई 28 जुलैला काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. त्याचदिवशी रात्री पीडितेच्या पित्याने ती झोपेत असताना तिच्यासोबत गैरप्रकार केला. विशेष म्हणजे आरोपीने त्यानंतरही पुन्हा दोनवेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान आई गावावरुन घरी आल्यानंतर पीडिकेने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला.

हेही वाचा :

प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या

मोबाईलवर गेम खेळतो म्हणून घरातल्यांनी हटकलं, रागात आई-वडिलांचा विचार न करता त्याची विहिरीत उडी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI