AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या

"दादा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आज मी हे पाऊल नाईलाजाने उचलत आहे. तू आपल्या आई-बाबांना समजावून सांग. माझ्या सासरच्या घरातून कोणतीही वस्तू परत घेऊ नका, एक चमचाही नाही" असा मेसेज तिने भावाला पाठवला

प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 3:45 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये जलनपूर येथे एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. विवाहितेने जीव देण्यापूर्वी तिच्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. यामध्ये तिने आपली व्यथा मांडत आत्महत्या करण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागितली होती. धक्कादायक बाब म्हणजे या ऑडिओमध्ये तिने आपल्या भावाला सासरच्या लोकांवर कोणतीही कारवाई करु नका, असेही सांगितले.

काय आहे प्रकरण?

बिजनौरच्या सबदलपूर येथील रहिवासी ओमप्रकाश यांनी आपली कन्या पूजाचे लग्न 10 महिन्यांपूर्वी जलीलपूरमधील खानपूर खादर येथील रहिवासी संजीव याच्याशी लावले होते. ओमप्रकाश यांनी लेकीच्या लग्नात कारही दिली होती. लग्नापूर्वी ओमप्रकाश यांना सांगण्यात आले होते, की जावई संजीव रेल्वेमध्ये तिकीट पर्यवेक्षक आहे. पण लग्नानंतर तो बेरोजगार असल्याचे समजले. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

लग्नानंतर हुंड्यासाठी छळ

पूजाच्या लग्नानंतरही तिच्या सासरी हुंड्याची मागणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्यासाठी तिला सातत्याने त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पूजाच्या माहेरच्यांनी ती 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. पूजाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 5 दिवसांपूर्वी हुंड्यावरील वादानंतर ते संजीवच्या घरी त्याच्याशी बोलण्यासाठीही आले होते. तेव्हाही दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता.

पूजाच्या ऑडिओ क्लीपमध्ये काय?

पूजाने तिचा भाऊ राजनला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यात ती म्हणाली होती की, “दादा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आज मी हे पाऊल नाईलाजाने उचलत आहे. तू आपल्या आई-बाबांना समजावून सांग. माझ्या सासरच्या घरातून कोणतीही वस्तू परत घेऊ नका, एक चमचाही नाही. जेव्हा तुमची बहीणच राहणार नाही, तेव्हा त्या घराशी काय संबंध असेल?” एवढेच नाही तर पूजा म्हणाली, “माझ्या सासरच्यांवरही कोणतीही कारवाई करू नका. त्यांना क्षमा करा”

पूजा सासरच्या मंडळींवर गुन्हा

दरम्यान, पूजाचे वडील ओमप्रकाश यांनी हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. यानंतर पोलिसांनी पूजाच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

भंडाऱ्यात गर्भवती सुनेचा गळा आवळून खून

दुसरीकडे, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींना सुनेकडे तगादा लावला होता. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडला. पती, दीर आणि सासूला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख आणण्याचा तगादा, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.