अनाथ आरक्षणाचा पहिला लाभार्थी ! नारायण इंगळे बनला प्रादेशिक वन अधिकारी, यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

अनाथ आरक्षणाचा पहिला लाभार्थी होण्याचा मान नारायण इंगळे या तरुणाला मिळालेला असून त्याला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या तरुणाचे अभिनंदन केले आहे.

अनाथ आरक्षणाचा पहिला लाभार्थी ! नारायण इंगळे बनला प्रादेशिक वन अधिकारी, यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
NARAYAN INGLE
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 7:57 PM

मुंबई : अनाथ बालकांसाठी नोकरी तसेच शिक्षणात एक टक्का आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अनाथ बालकांना 1 टक्का आरक्षण देण्यात आले. आता याच आरक्षणाचा पहिला लाभार्थी होण्याचा मान नारायण इंगळे या तरुणाला मिळालेला असून त्याला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या तरुणाचे अभिनंदन केले आहे. (Narayan Ingle become first beneficiary of the orphan reservation appointed as Regional Forest Officer congratulated by yashomati thakur)

दूरध्वनी करत यशोमती ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

आरक्षणाचा लाभ मिळाल्यामुळे नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी म्हणून रुजू होता येणार आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून यशोमती ठाकूर यांनी संपर्क साधला तसेच त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच अनाथ बालकांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

राज्यसेवा परीक्षा 2019 चा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल 28 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. एमपीएससीने या संदर्भात परिपत्रक जारी केलं होतं. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर केला होता. या निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये

दरम्यान, येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक एमपीएससी जाहीर करणार आहे. तसं परिपत्रक जारी करत एमपीएसी आयोगाने माहिती दिली आहे.

इतर बातम्या :

दबाव टाकणाऱ्यांची गय नाही, आम्ही स्वायत्त ! MPSC कडून कारवाईचे संकेत

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

आता पेट्रोल पंपावरही ई-वाहन चार्ज करता येणार, HPCL 5000 पंपांवर EV चार्जिंग स्टेशन उभारणार

(Narayan Ingle become first beneficiary of the orphan reservation appointed as Regional Forest Officer congratulated by yashomati thakur)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.