महिलांवरील अत्याचार थांबू दे, सर्वांना सुबुद्धी दे; यशोमती ठाकूरांचं महालक्ष्मीला साकडं

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. 

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सर्वांना सुबुद्धी दे; यशोमती ठाकूरांचं महालक्ष्मीला साकडं
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 6:38 PM

अमरावती : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.

“आदिमाया, आदिशक्ती, महालक्ष्मी राज्यातील प्रत्येक माणसाच्या घरात धनधान्य, सुखसौख्य, समृद्धी नांदू दे यंदा पाऊसकाळ चांगला झालाय अशीच तुझी कृपा राहू दे, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लढण्याचं बळ दे. बळीराजाला जसं पावसाचं दान दिलं, तसंच राज्यातील कोविडची महामारी लवकरात लवकर दूर कर, केंद्रातल्या सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर. मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे माय, माय भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर गं माय”. अशा शब्दात महालक्ष्मी मातेकडे राज्याच्या हितासाठी ठाकूर यांनी साकडे घालून प्रार्थना केली.

शेतकऱ्यांना बळ दे; देवेंद्र फडणवीसांचं गणरायाला साकडं

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण त्यांना साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे, ते संकट आता दूर झालं पाहिजे. आपलं जीवन पूर्वीसारखं सुचारू झालं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येतात, कधी पुराचं, कधी वादळाचं तर कधी अतिवृष्टीचं आहे, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. त्याचसोबत गणरायाने आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

इतर बातम्या

बाळासाहेब थोरात म्हणाले, पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं; वडेट्टीवार म्हणतात, बाळासाहेबांची भूमिका योग्यच!

सोमय्यांनी मुश्रीफांविरोधात बत्ती लावली, उद्या ईडीकडे तक्रार नोंदवणार तर परवा केंद्रात तीन ठिकाणी पुरावे देणार

सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा; नवाब मलिकांचा घणाघात

(Give everyone a good intellect, Yashomati Thakur’s prayer to Mahalaxmi)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.