दबाव टाकणाऱ्यांची गय नाही, आम्ही स्वायत्त ! MPSC कडून कारवाईचे संकेत

राज्यातील वेगवेगळ्या शासकीय भरती प्रक्रियेसाठी असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाने कडक पवित्रा धारण केला आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात संघटनांकडून तसेच असंघटित व्यक्ती यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे.

दबाव टाकणाऱ्यांची गय नाही, आम्ही स्वायत्त ! MPSC कडून कारवाईचे संकेत
एमपीएससी
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 7:01 PM

मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या शासकीय भरती प्रक्रियेसाठी असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाने कडक पवित्रा धारण केला आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात संघटनांकडून तसेच असंघटित व्यक्ती यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे. आयोगाने याबाबत एक सविस्तर पत्रक जारी केले आहे.

दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर कारवाई 

राज्य सरकारच्या विविध विभागात नोकरभरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. राज्य लोकसेवा आयोगाकडून या भरती प्रक्रियेचे संचलन तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यात येते. राज्य लोकसेवा आयोग हा स्वायत्त आहे. त्यावर राज्य सरकार तसेच कोणतीही संघटना किंवा व्यक्ती यांचे नियंत्रण नसते. मात्र, मागील काही वर्षांपासून या आयोगावर विविध संघटना तसेच असंघटित व्यक्ती यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे निदर्शनास आल्याचे आयोगाे म्हटलेय. याच गोष्टीची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने आता कडक पवित्रा धरण केला आहे. यापुढे आोयगावर कोणत्याही संघटनेने वा असंघटित व्यक्तीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला वा तसे निदर्शनास आले तर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

आयोगाकडून नेहमी गुणवत्तेवर विचार केला जातो

राज्य लोकसेवा आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. असे असले तरी आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेसंदर्भात उमेदवारांकडून ज्या तक्रारी तसेच आवेदने येतात, त्याचा नेहमी गुणवत्तेवर विचार केला जातो, असंदेखील आयोगाने आपल्या पत्रकार म्हटलं आहे. राजकीय संघटनांमार्फत आयोगावर येणारा दबाव पाहता एमपीएससीने त्यांची कार्यपद्धती स्पष्ट केलीय.

MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्यास विलंब 

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्यास सांगितली होती. मात्र, काही विभागांनी एमपीएससीला माहिती देण्यास दिरंगाई केल्याचं समोर आलं आहे. सरकारमधील रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन हुकली आहे. MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते.

पुन्हा मुदतवाढ मिळणार?

राज्य सरकारनं माहिती एमपीएससीकडे जमा करण्यासाठी यापूर्वी 15 सप्टेंबरपर्यंत ही माहिती जमा करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यावेळी एकाही विभागाने माहिती जमा न केल्याने सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवली होती.राज्य सरकार रिक्त पदांची माहिती जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देणार का हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या :

MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्याची डेडलाईन हुकली, सरकारी विभागांची धावपळ सुरु

मोबाईलवर गेम खेळतो म्हणून घरातल्यांनी हटकलं, रागात आई-वडिलांचा विचार न करता त्याची विहिरीत उडी

VIDEO: कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, भुजबळांचं कांदे वादावर वक्तव्य

(mspc will take action against people and organisations who try to pressurize)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.