MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्याची डेडलाईन हुकली, सरकारी विभागांची धावपळ सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्यास सांगितली होती. मात्र, विभागांनी माहिती देण्यास दिरंगाई केल्याचं समोर आलं आहे.

MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्याची डेडलाईन हुकली, सरकारी विभागांची धावपळ सुरु
GOVERNMENT JOBS


मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्यास सांगितली होती. मात्र, काही विभागांनी माहिती एमपीएससीला देण्यास दिरंगाई केल्याचं समोर आलं आहे. सरकारमधील रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन हुकली आहे. MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी राज्य सरकारच्या रिक्त पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती करण्याची घोषणा केली आहे.

10 विभागांनी दिली माहिती

महाराष्ट्र सरकारच्या 43 विभागांपैकी केवळ 10 विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा केल्याचं समोर आलं आहे. 43 पैकी 10 विभागांनी माहिती जमा केल्यानंतर इतर विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचं दिसून आलं आहे.

या विभागांनी दिली माहिती

एमपीएससीकडे माहिती देणाऱ्या विभागांमध्ये पोलीस, महसुल, राज्य उत्पादन शुल्क, कामगार, वित्त व लेखा, परिवहन, शिक्षण, कौशल्य विकास, वनसेवा, मंत्रालय या विभागांचा समावेश आहे. उर्वरित विभागांची रिक्त पदांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ

पुन्हा मुदतवाढ मिळणार?

राज्य सरकारनं माहिती एमपीएससीकडे जमा करण्यासाठी यापूर्वी 15 सप्टेंबरपर्यंत ही माहिती जमा करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यावेळी एकाही विभागाने माहिती जमा न केल्याने सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवली होती.राज्य सरकार रिक्त पदांची माहिती जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देणार का हे पाहावं लागणार आहे.

माहिती 2 दिवसात जमा होण्याची शक्यता

राज्य शासनाच्या उर्वरित विभागांकडून येत्या दोन ते तीन दिवसात इतर माहिती जमा होईल, अशी शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारमधील 15 हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून रिक्त पदांची माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

15511 पदं भरण्यास मान्यता

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली.

इतर बातम्या:

जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार, अजितदादांचा दावा; केंद्र सरकारवरही टीका

Special Report | भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची जोरदार टोलेबाजी

Maharashtra Government Departments fail to submit vacant post information to mpsc

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI