MNS Vasant More | ‘मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही’ – वसंत मोरेंची रुपाली ठोंबरेंवर खोचक टीका
रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री प्लॅन आहे. येत्या महापालिका निवडणुकात मनसेची ताकद दिसेल. पक्षांर्गत वादाचा विषय मी स्वतः राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर विषय मिटवला होता.

पुणे – महाराष्ट्र नवा निर्माण सेनेपक्षांतर्गत कलहातून प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही, अशी बोचरी टीका मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होतेय अशी टीका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी केली होती, मात्र रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असेआव्हानही वसंत मोरे यांनी केले आहे.
हा सगळा प्री- प्लॅन
रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री प्लॅन आहे. येत्या महापालिका निवडणुकात मनसेची ताकद दिसेल. पक्षांर्गत वादाचा विषय मी स्वतः राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर विषय मिटवला होता, असेही मोरे यांनी म्हटले आहे.
मोरे यांचे ट्विट चर्चेचा विषय
ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर नगरसेवक वसंत मोरे यांचे ट्विट ही चर्चेचा विषय ठरेल होते. मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत स्वतः व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या सोबतचा फोटो शेअर करत ‘जब हम दो साथ खडे तो सबसे बडे , अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे कॅप्शन दिले होते. सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेच मनसेचे नगरसेवक आहेत.
पक्षातील नेत्यांना कंटाळून राजीनामा
मागील काही दिवसांपूर्वी पक्षातील लोकच आपल्या विरोधात पक्ष नेतृत्वाचे कान भरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्यमुळे मला निर्णय घ्यावा लागेल असेही ठोंबरे म्हणाल्या होत्या. पुणे पदवीधरच्या निवडणुकीतील पराभव हा पक्षाच्या नेत्यांनी ‘मनसे’ साथ दिली नसल्याने झाला असल्याची खंत त्या खासगी बोलून दाखवत होत्या. पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. मात्र, हे पद काढण्याआधी काही मिनिटेच कल्पना दिली होती. पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोप रुपाली यांनी उघडपणे केला होता.
Rupali Patil PC | सध्या दोन पर्याय, तिसरा पर्याय आला तर विचार करेन