Monsoon Update : “बिपोरजॉय”ची तीव्रता वाढली, मान्सूनवर काय झाला परिणाम, वाचा आयएमडीचे अपडेट

Monsoon and cyclone : मान्सूनला बिपोरजॉय या चक्रीवादळाने रोखून धरले होते. हे वादळ तीव्र झाले असून त्याची वाटचाल उत्तरेकडे सुरु झाली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.

Monsoon Update : “बिपोरजॉय”ची तीव्रता वाढली, मान्सूनवर काय झाला परिणाम, वाचा आयएमडीचे अपडेट
rain
| Updated on: Jun 08, 2023 | 8:48 AM

पुणे : अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका नाही. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या गतीवर होण्याची शक्यता असली तरी वादळाची दिशा पाहता कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बिपरजॉय’चा परिणाम केरळमध्ये धीमा

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होत आहे. केरळमध्ये त्याचा परिणाम धीमा असेल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. १२ जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात अत्यंत तीव्र चक्रीवादळाची परिस्थिती राहणार असल्याचे दिसत आहे. केरळ, लक्षद्वीप, किनारपट्टीचा भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशता पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता आहे. ९ जूनपर्यंत दरम्यानं अंदमान निकोबारमध्ये पाऊस पडणार आहे, ११ जूनपर्यंत केरळमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.

केरळमध्ये मान्सून पुढील ४८ तासांत कधीही दाखल होऊ शकतो. केरळमध्ये मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

मान्सूनचा अंदाज कशामुळे

  • दक्षिण अरबी समुद्रावर पश्‍चिमेकडील वारे कायम आहेत.
  • पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे.
  • अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्‍यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे.
  • या सर्व कारणांमुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून मान्सून पूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 12 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे गर्मीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात कधी येणार पाऊस

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही