MPSC च्या विद्यार्थ्यांचे आता पुन्हा आंदोलन का ? काय आहे मागणी ?

| Updated on: Mar 01, 2023 | 3:46 PM

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता तांत्रिक सेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2025पासून लागू करण्याच्या मागणी केलीय. आता यावर काय भूमिका मंडळाकडून घेतली जाते, यावर लक्ष लागले आहे.

MPSC च्या विद्यार्थ्यांचे आता पुन्हा आंदोलन का ? काय आहे मागणी ?
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे येथे MPSC विद्यार्थ्यांच्या आज पुन्हा आंदोलन झाले.  एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली होती. परंतु ही मागणी फक्त राज्यसेवा परीक्षेसंदर्भातील होती. आता तांत्रिक सेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलेय. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. आता विद्यार्थ्यांच्या या मागणीवर शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

का केले आंदोलन

हे सुद्धा वाचा

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एमपीएससी विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. ज्या प्रमाणे शासनाने व आयोगाने राज्य सेवा परीक्षेसाठी अभ्यासक्रम 2025पासून लागू करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे तांत्रिक सेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2025पासून लागू करण्याच्या मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. ही परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने न घेता बहुपर्यायी पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. लोकसेवा आयोगानं तांत्रिक सेवेच्या विद्यार्थ्यांनाही विचारात घ्यायला हवं, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी बुधवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.

आंदोलकांच्या नक्की मागण्या काय?

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये.तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशा प्रमुख 4 मागण्या आंदोलकांच्या आहेत.

आंदोलकांचा नव्या पद्धतीला विरोध नसून त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीला विरोध होता. साधारणपणे दर 10 वर्षांनी परीक्षा पद्धतीत बदल होतो. याआधी 2014 पर्यंत एमपीएससीची परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीनंच होत होती. 2014 ते 2023 पर्यंत तिचं स्वरुप पर्यायवाचक झालं. आता 2023 मध्ये पुन्हा परीक्षेचं स्वरुप सविस्तर लेखी पद्धतीनं आहे.

सध्याची पद्धत कशी होती

सध्या एमपीएससी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पर्यायवाचक पद्तीनं होती. ज्यात प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या ४ पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो.नपण नव्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा डिस्क्रिपटिव्ह म्हणजे वर्णनात्मक होणार आहे. ज्यात प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे लिहावं लागेल.

ही नवीन पद्धती जून 2023 पासून लागू होत आहे. मात्र इतक्या कमी वेळेत नव्या पद्धतीचा अभ्यास करण्यास अवधी मिळावा, यासाठी ही नवी पद्धती 2023 पासून लागू करण्याची मागणी केली जात आहे. कारण गेल्या चार पाच वर्षांपासून विद्यार्थी जुन्या पद्धतीने अभ्यास करत आहे. आता अचानक नवीन पद्धत केली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते.