मुंबई, पुणे एक्स्प्रेस वे वर तीन वाहनांचा विचित्र अपघात, दुधाचे टँकर कलंडले

| Updated on: Mar 25, 2024 | 2:05 PM

mumbai pune expressway accident: पुण्याहून मुंबईकडे दूध टँकर जात होते. यावेळी खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना टँकर चालकाने लेन बदली. यामुळे टँकर अचानक कलंडले. त्याचवेळी हे टँकर कारवर समोरील बाजूला आदळले. त्यानंतर समोर जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

मुंबई, पुणे एक्स्प्रेस वे वर तीन वाहनांचा विचित्र अपघात, दुधाचे टँकर कलंडले
पुणे-मुंबई महामार्गावर झालेला अपघात
Follow us on

मुंबई, पुणे एक्स्प्रेस वे वरुन रोज हजारो वाहने जात असतात. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होत असते. आता रविवारी या महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दूधाचे टँकर होते. त्यामुळे टँकरमधील दूध रस्त्यावर पसरले. अपघातात दुधाच्या टँकरचा चालक ठार झाला. दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. परंतु सुदैव चांगले होते, कारमधील दोघे जण बचावले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी गाठले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवले आणि अपघातग्रस्त वाहनांना बाजुला केले.

कसा झाला अपघात

पुण्याहून मुंबईकडे दूध टँकर जात होते. यावेळी खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना टँकर चालकाने लेन बदली. यामुळे टँकर अचानक कलंडले. त्याचवेळी हे टँकर कारवर समोरील बाजूला आदळले. त्यानंतर समोर जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावर सर्व दूध सांडले. यामुळे सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या या मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक बंद होती. अपघातात दूध टँकरचा चालक ठार तर कारमधील दोघे प्रवासी बचावले.

महामार्गावर कलंडलेले टँकर

वाहतूक सुरुळीत

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा तत्काळ पोहचली. त्यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवले. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरुळीत करण्याचे काम सुरु केले. टँकर रस्त्याच्या बाजूला हलवण्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.

अमरावती जिल्ह्यात पाच अपघात, दहा जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात होळीच्या दिवशी अमरावती पाच अपघात झाले. पाच वेगवेगळ्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. मेळघाटात दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दारसिंबे कुटुंब ठार झाले. दुसऱ्या अपघातात मेळघाटमधील घंटाग सेमाडोह रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली. बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गावर दुचाकीचा अपघातामध्ये दोन मावसभाऊ ठार झाले.