नऊ दिवस फरार असलेला निलेश चव्हाणला पहाटे पुण्यात आणले, नेपाळमध्ये झाली होती अटक

Nilesh Chavan Arrested : वैष्णवी हगवणे याच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप असलेला निलेश चव्हाण याला नेपाळमध्ये अटक केली. निलेश चव्हाण याला पुण्यात आणल्यानंतर पहाटेच थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.

नऊ दिवस फरार असलेला निलेश चव्हाणला पहाटे पुण्यात आणले, नेपाळमध्ये झाली होती अटक
निलेश चव्हाण याला अटक
| Updated on: May 31, 2025 | 7:35 AM

Nilesh Chavan Arrested : वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमध्ये अटक झाली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर पुण्यात आणले. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेश तीन राज्यातून प्रवास करत नेपाळमध्ये पोहचला होता. पोलिसांनी त्याला नेपाळच्या सीमेवर बेड्या ठोकल्या. त्यानंतर विमानाने त्याला पुण्यात आणले. मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर निलेशला घेऊन पोलीस पोहचले. निलेश चव्हाण याला सकाळी दहा वाजता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून त्याची दहा दिवस कोठडी मागण्यात येणार आहे.

निलेश चव्हाण याला पुण्यात आणल्यानंतर पहाटेच थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. गेली नऊ ते दहा दिवस तीन राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहचला होता. तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला होता. त्याच ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि ऍन्टी गुंडा स्कॉडने त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांची सहा पथके निलेशचा शोध घेत होती.

लोकेशन कळू नये म्हणून हे केले…

निलेश चव्हाण याने पोलिसांना लोकेशन कळू नये, म्हणू काळजी घेतली होती. ऑनलाईन व्यवहार केल्यावर पोलिसांना लोकेशन कळेल, यामुळे त्याने पुणे सोडताना लाखो रुपयांची रोकड सोबत घेतली होती. त्याने वेगवेगळे काही सिमकार्ड मिळवून त्याचा वापर केला. तसेच नेपाळमध्ये त्याने नवीन सिमकार्ड मिळवले.

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड टाकून त्याचा तो वापर करत होता. तसेच कोणालाही संपर्क करायचा असेल तर नेट कॉलिंग तो करत होता. नेट कॉलिंग करुनच त्याने काही वकिलांशी संवाद साधला होता. तसेच तो माझा फोन बंद पडला, असे सांगून इतर लोकांकडून फोन किंवा वायफाय घेऊन त्याचा वापर करत होता. परंतु दिल्लीतील बसमधील मिळालेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. वैष्णवी हगवणे यांचे नऊ महिन्यांचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होते. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हिचा मित्र आहे.