पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

| Updated on: Feb 23, 2021 | 7:22 AM

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. | Pimpari Chinchwad Night Curfew

पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद
पिंपरी चिंचवड शहरात नाईट कर्फ्यू
Follow us on

पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. काल रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. (Pimpari Chinchwad Night Curfew Police Action Against Who Break the Rule)

संचारबंदीचंं उल्लंघण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगारात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं. शहरांत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिस चौकशी करत होते.

दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी शहरात काय परिस्थिती?

पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केल्यानंतर काल रात्री संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. अनेक नागरिक रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास घराबाहेर आढळून आले. नागरिकांच्या घराबाहेर पडण्याचं कारण काय? याची पहिल्यांचा चौकशी केली. जे नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडले त्यांना पोलिसांनी नियम समजावून सांगितले.

काही ठिकाणी पोलिसांनी नागरिकांचं प्रबोधन केलं. तर काही ठिकाणी आगाऊ लोकांना पोलिसांनी आपल्या लाठीचा प्रसादही दिला. मास्क न वापरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करत आर्थिक दंड वसूल केला.

पुणे, पिंपरी चिंचवडसाठी नव्याने काही निर्णय

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यासाठी नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत. शाळा कॉलेज बंद– गर्दी होत असल्याने पहिल्या टप्प्यात 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा कॉलेज बंद असतील. अभ्यासिका सुरु असल्या तरी सोशल डिस्टन्स पाळणं अनिवार्य राहणार आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट- रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे. वाहतूक व्यवस्था सुरु- शहरातील सर्व खासगी आणि सार्वजनिक व्यवस्था सुरु राहणार आहे. मात्र नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे.

(Pimpari Chinchwad Night Curfew Police Action Against Who Break the Rule)

हे ही वाचा :

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, कोरोना संकटाबाबत जरा जपून बोला, सामनातून टीकेचे बाण

बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून नियमावलीत बदल, सुधारित आदेश जारी