बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून नियमावलीत बदल, सुधारित आदेश जारी

बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच नगर परिषद अंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा
  • Published On - 22:59 PM, 22 Feb 2021
बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून नियमावलीत बदल, सुधारित आदेश जारी

बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियमावली जारी केली होती. पण आता त्या नियमावलीत काही बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच नगर परिषद अंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता अन्य सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी सोमवारी दुपारी एक आदेश काढला होता. त्या आदेशात रात्री काहीसा बदल करण्यात आला आहे.(Changes in Corona Rules by Buldhana District Collector)

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश काय?

>> हॉटेल, रेस्टॉरंट यांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण या दरम्यान फक्त होम डिलिवरीची सुविधा उपलब्ध असेल.

>> सर्व खासगी, वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सक सेवा नियमित वेळेनुसार सुरु राहतील.

>> कोणतेही रुग्णालय रुग्णांना सेवा नाकारणार नाही.

>> औषधी दुकाने आणि रुग्णवाहिकांची सेवा 24 तास सुरु राहणार आहे.

>> पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस एजन्सी सुरु राहणार आहेत.

>> पूर्वनियोजित परीक्षा वेळेनुसार होतील.

>> चिकन, मांस, अंडी विक्रीची दुकानं सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळत सुरु राहतील.

>> कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया उद्योगही सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत सुरु राहणार आहेत.

कोरोना सेंटर्सची दुरवस्था

बुलढाणा जिल्ह्यात सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत; त्या कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. कोव्हिड सेंटर्समध्ये प्रचंड अस्वच्छता झाली आहे. येथे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असून यामध्ये बॉटल्स इंजक्शन्स, सलाईन यांना उघड्यावर टाकण्यात येत आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बुलडाण्यातील अपंग निवासी शाळेतील कोव्हिड सेंटरमध्ये अशा प्रकारे अस्वच्छता पसरली आहे.

बुलडाणा शहरातल्या अपंग निवासी शाळेत कोविड सेंटर असून याठिकाणी दररोज शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या सेंटरमध्ये जिकडेतिकडे अस्वच्छता पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. वैद्यकीय कचरासुद्धा रुग्णालयातच पसरलेला आहे. या सर्व प्रकारामुळे या कोव्हिड सेंटरची परिस्थीत अतिशय विदारक झाली आहे. तशी व्यथा येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडली.

आठवडी बाजार बंद

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बुलडाणा शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानुसार आजचा आठवडी बाजार बंद होता. बाजारातील सर्व दुकाने, भाजी मंडई, पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Changes in Corona Rules by Buldhana District Collector