बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन अधिक कडक, फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार

बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन अधिक कडक, फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार

बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखलीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सागर जोशी

|

Feb 22, 2021 | 4:22 PM

बुलडाणा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असताना आता बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखलीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे.(Lockdown in Buldhana district tightened against the backdrop of increasing prevalence of corona)

22 फेब्रुवारी म्हणजे सोमवारपासून ते 1 मार्च दरम्यान नवे आदेश लागू राहणार आहेत. त्यात रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान किराणा, भाजीपाला आणि पिठाची गिरणी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. इतकच नाही तर प्रतिबंधित क्षेत्रातील औषध दुकानंही सकाळी 8 ते दुपारी 3 यावेळेतच सुरु राहणार आहेत. तर दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते रात्री 8.30 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखली या पाचही नगर पालिकांसाठी हा आदेश लागू असणार आहे.

कोरोना सेंटर्सची दुरवस्था

बुलढाणा जिल्ह्यात सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत; त्या कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. कोव्हिड सेंटर्समध्ये प्रचंड अस्वच्छता झाली आहे. येथे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असून यामध्ये बॉटल्स इंजक्शन्स, सलाईन यांना उघड्यावर टाकण्यात येत आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बुलडाणा शहरातल्या अपंग निवासी शाळेत कोविड सेंटर असून याठिकाणी दररोज शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या सेंटरमध्ये जिकडेतिकडे अस्वच्छता पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. वैद्यकीय कचरासुद्धा रुग्णालयातच पसरलेला आहे. या सर्व प्रकारामुळे या कोव्हिड सेंटरची परिस्थीत अतिशय विदारक झाली आहे. तशी व्यथा येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडली.

आठवडी बाजार बंद

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बुलडाणा शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानुसार आजचा आठवडी बाजार बंद होता. बाजारातील सर्व दुकाने, भाजी मंडई, पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.

जिल्ह्यात रुग्णांची स्थिती काय?

मागील 5 दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आलेख वाढतो आहे. 15 फेब्रुवारी रोजी 129 कोरोनाग्रस्त आढळले होते. तर 17 फेब्रुवारी रोजी हाच आकडा 199 वर पोहोचला होता. 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 च्या पुढे गेला होता. या दिवशी 270 जणांना कोरोना झाल्याचे आढळले होते. 20 फेब्रुावारी रोजी 215 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Lockdown in Buldhana district tightened against the backdrop of corona

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें