AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! बुलडाण्यात कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था; इंजक्शन, सलाईन बॉटल्स उघड्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष

बुलडाण्यातील कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. येथे वैद्यकीय कचरा उघड्यावर पडला आहे. (buldana covid centers deteriorating)

धक्कादायक ! बुलडाण्यात कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था; इंजक्शन, सलाईन बॉटल्स उघड्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष
रुग्णालयात अशा प्रकारे वैद्यकीय कचरा पडलेला आहे.
| Updated on: Feb 21, 2021 | 4:06 PM
Share

बुलडाणा : कोरोना रुणांच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण राज्यामध्ये आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालेय. तर बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत; त्या कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. कोव्हिड सेंटर्समध्ये प्रचंड अस्वच्छता झाली आहे. येथे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असून यामध्ये बॉटल्स इंजक्शन्स, सलाईन यांना उघड्यावर टाकण्यात येत आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.  (buldana condition of the covid centers is deteriorating)

बुलडाणा शहरातल्या अपंग निवासी शाळेत कोविड सेंटर असून याठिकाणी दररोज शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या सेंटरमध्ये जिकडेतिकडे अस्वच्छता पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. वैद्यकीय कचरासुद्धा रुग्णालयातच पसरलेला आहे. या सर्व प्रकारामुळे या कोव्हिड सेंटरची परिस्थीत अतिशय विदारक झाली आहे. तशी व्यथा येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडली.

आठवडी बाजार बंद

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बुलडाणा शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानुसार आजचा आठवडी बाजार बंद होता. बाजारातील सर्व दुकाने, भाजी मंडई, पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.

जिल्ह्यात रुग्णांची स्थिती काय?

मागील 5 दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आलेख वाढतो आहे. 15 फेब्रुवारी रोजी 129 कोरोनाग्रस्त आढळले होते. तर 17 फेब्रुवारी रोजी हाच आकडा 199 वर पोहोचला होता. 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 च्या पुढे गेला होता. या दिवशी 270 जणांना कोरोना झाल्याचे आढळले होते. 20 फेब्रुावारी रोजी 215 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. लग्न समारंभावर निर्बंध

बुलडाण्यातील अपंग निवासी शाळेतील कोव्हिड सेंटरमध्ये अशा प्रकारे अस्वच्छता पसरली आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे.कोरोना नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासंबंधीचे आदेश प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

इतर बातम्या :

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Rajesh Tope on Local | लोकल ट्रेनची वेळ वाढवण्याबाबत अजूनही चर्चा सुरु: राजेश टोपे

(buldana condition of the covid centers is deteriorating)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.