PUNE : पिंपरी चिंचवडकरांनी ढोसली सर्वाधिक बियर, पुणे जिल्ह्यात बियरच्या विक्रीत 30 लाख लिटरने वाढ

| Updated on: May 22, 2022 | 8:34 AM

महाराष्ट्र राज्याने यावर्षी कडक उन्हाळा पाहिला आणि अनेक दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा नागरिकांना सामना करावा लागला. अशा परिस्थितीत उष्णतेच्या लाटेपासून काही काळ सुटका होण्यासाठी अनेक नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेतला आहे.

PUNE : पिंपरी चिंचवडकरांनी ढोसली सर्वाधिक बियर, पुणे जिल्ह्यात बियरच्या विक्रीत 30 लाख लिटरने वाढ
Image Credit source: twitter
Follow us on

पिंपरी चिंचवड – राज्यात मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशात प्रचंड उन्हाचा तडाखा लागत आहे. त्यातचं अनेकदा उष्णतेच्या लाटा आल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले होते. परंतु पुणेकरांनी उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अधिक बियर (Beer) रिचवली असल्याचं समोर आलं आहे. जानेवारी महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) मधील मद्यशौकिनांनी (Alcohol lovers)तब्बल 52 लाख 81 हजार 97 लिटर बियर रिचवली आहे. मागच्या दोन वर्षातील सगळ्यात जास्त बियरची मागणी वाढली आहे. फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात देखील प्रचंड उकाडा असल्याने मद्यशौकीनांची बियरला पसंती असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.

बिअरचा सर्वात मोठा वाटा

महाराष्ट्र राज्याने यावर्षी कडक उन्हाळा पाहिला आणि अनेक दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा नागरिकांना सामना करावा लागला. अशा परिस्थितीत उष्णतेच्या लाटेपासून काही काळ सुटका होण्यासाठी अनेक नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेतला आहे. बिअरचा सर्वात मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यात बिअरची विक्रमी विक्री झाली आहे. त्यामुळे महसुलात 213 कोटींची वाढ झाली आहे.

मात्र यंदा त्यात 213 कोटींची वाढ झाली आहे

गेल्या वर्षी हा महसूल 1,434 कोटी रुपये होता. मात्र यंदा त्यात 213 कोटींची वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात बिअरच्या विक्रीत 30 लाख लिटरने वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या म्हणण्यानुसार, 2021-22 मध्ये बिअर, दारू (देशी दारू) आणि वाईनची विक्रमी विक्री झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021-22 मध्ये बिअरच्या विक्रीत सुमारे 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण 2019-20 च्या तुलनेत त्यात 22 टक्क्यांनी घट झाली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्योगाने पुन्हा उभारी घेतली

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत गेल्या वर्षी पहिल्यांदाच राज्यात दारू विक्री वाढली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात दारूची दुकाने आणि बिअर बार बंद झाल्यामुळे या व्यवसाय क्षेत्रावर वाईट परिणाम झाला होता.

परंतु 2021-22 मध्ये मात्र या उद्योगाने पुन्हा उभारी घेतली.