पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार

| Updated on: Jan 04, 2022 | 8:00 AM

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता तो सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करून 6 जानेवारीला दिला जाणार आहे. त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Image Credit source: Tv9
Follow us on

पिंपरी- आगामी महानगरपालिकेच्या निवडणूकाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. कार्यकर्ते, नेत्यांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. याचवेळी पिंपरी- चिंचवड महापालिकेने त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्याचे नकाशे व प्रभागनिहाय माहितीचे काम सुरु आहे. या माहितीची कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी येत्या गुरुवारी ( 6जानेवारी ) सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

निवडणूक लवकर होण्याची शक्यता
महापालिकेने महापालिकेने त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्याचे नकाशे व प्रभागनिहाय माहितीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार कच्चा आराखडा पेनड्राईव्हवर राज्य निवडणूक आयोगास 6 डिसेंबरला सादर केला आहे. त्यावर आयोगासमोर 11 डिसेंबरला सादरीकरण करण्यात आले. त्याबाबतच्या काही त्रुटींवर 13 डिसेंबरला पुन्हा आयोगासमोर चर्चा झाली. त्यानंतर आयोगाने आराखडा स्वीकारला आहे. आराखड्यात आयोग आपल्या पद्धतीने बदल करू शकतो. आराखडा सादर केल्यानंतर 3 आठवड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कच्चा आराखड्याची सॉफ्ट कॉपी 6 जानेवारीला सादर करणाची सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिली आहे. त्यामुळे निवडणूका वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगानुसार कार्यवाही सुरू
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता तो सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करून 6 जानेवारीला दिला जाणार आहे. त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय, पंकजांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

‘आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

फ्री- वायफायचा वापर करत आहात? तर आधी या धोक्यांना ओळखा, तुमचा डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ना?