पुण्यातील काही भागातील वीज पुरवठा सुरु मात्र अद्यापही निम्म्या शहारात वीज नाही

शहरातील पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. पुढील दीड तासात संपूर्ण शहरातील वीज पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पुण्यातील काही भागातील वीज पुरवठा सुरु मात्र अद्यापही निम्म्या शहारात वीज नाही
Breaking News
| Updated on: Feb 09, 2022 | 12:58 PM

पुणे – वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्समिशन लाईनमध्ये समस्या निर्माण झाल्याने पुण्यासह, पिंपरी चिंचवडमधील वीज पुरवठा खंडित झाला होता.तब्बल सहा तासांच्या खंडानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.मात्र अद्यापही शहरातील मोठा भागात अद्यापही वीज नसल्याचे समोर आले आहे. सकाळी 11.15 वाजेपर्यंत कल्याणीनगर, धायरी , वाणवडी , हिंजवडीतील भूमकर चौक परिसर, खराडी अशा काही भागांत पुरवठा पूर्ववत झाला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.